हैद्राबाद : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने सोमवारी मुंबईत इंटिरिअर डिझाइनवर आधारित पत्नी गौरी खानचे 'माय लाइफ इन डिझाइन' कॉफी टेबल बुकचे लाँच केले होते. पुस्तक लाँचच्या वेळी शाहरुख आणि गौरी ही पापाराझींसमोर पोझ देत होते. मीडिया संवादादरम्यान किंग खान हा त्याच्या पत्नीसोबतच्या नात्याबद्दलही बोलला आणि त्याने याविषयी काही रंजक गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, एका पतीचे कर्तव्य कसे असते याबाबत अनुभव सांगितला. शाहरुखने यावेळी गौरी खानचे कौतुक करत सांगितले की, ती एक अद्भुत पत्नी आहे, जी तिची भूमिका परिपूर्णपणे सांभाळते.
गौरी खानचे केले कौतुक :माध्यमांशी संवाद साधताना शाहरुख खान म्हणाला की, 'गौरी आणि मी एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतो, ती 14 वर्षांची होती, मी 18 वर्षांची होतो. कधी कधी तुम्ही एकमेकांना वर्षानुवर्षोपासून ओळखता तर त्यामुळे एकमेकांच्या कामाबद्दल कौतुकाची भावना ही कमी होऊ लागते. त्यानंतर तुम्ही एकमेकांना गांभीर्याने घेत नाहीत. मी जे काही करतो ते मी खूप दिवसांपासून करत आहे आणि गौरीने तिची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. आम्ही तीन सुंदर मुले वाढवली आहेत.
शाहरुख मानले गौरीचे आभार : गौरी खानबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, 'ती एका फिल्म स्टारची पत्नी आहे, जी देव आणि लोकांच्या कृपेने लोकप्रिय झाली आहे.' शाहरुख पुढे म्हणाला, 'आमच्या दहा वर्षांच्या मुलासह (अबराम) आमच्या संपूर्ण कुटुंबाची भावना ही प्रेमाची आहे. 'मला वाटते की आमच्या वैवाहिक आयुष्यातील 23 ते 24 वर्षे आम्ही मुंबईत स्थायिक होण्यात व्यस्त होतो हे कधीचं आम्हाला, लक्षातही आले नाही. मी या व्यवसायात आलो ते फक्त सामोर जाण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यासाठी आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी. आम्ही याचा कधीचं विचार केला नाही की, जीवनासाठी आवश्यक एक पैलू आहे ते आम्हाला कधीच कळला नाही. 'मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे.' पुस्तकात त्यांच्या 'मन्नत' आणि मुंबईतील वास्तव्याची काही खास छायाचित्रेही आहेत. यासोबतच शाहरुख खान म्हणाला, 'गौरी ही आमच्या संपूर्ण घरात सर्वात व्यस्त असते आणि जेव्हा मी तिला विचारतो की तू इतके काम का करते, तेव्हा ती म्हणते की मला समाधान मिळते. या अर्थ असा असतो की सर्वांचा एकत्र जेवायचे आहे आणि डिनरमध्ये चर्चा करायची आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस कसा गेला हे सर्व आम्ही रात्री जेवणाच्या शेवटी चर्चा करतो. यशाचा हा मंत्र गौरीने कुटुंबाला दिल्याबद्दल शाहरुख तिचे आभार मानले.
हेही वाचा :Adah Sharma Road Accident : 'द केरळ स्टोरी'च्या वाहनाला अपघात, अदा शर्माने सुखरुप असल्याची दिली माहिती