महाराष्ट्र

maharashtra

Salman Khan's Billi Billi song released : सलमान खानच्या टायगर 3 मधील बिल्ली बिल्ली गाणे रिलीज

By

Published : Mar 2, 2023, 3:06 PM IST

सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या आगामी टायगर चित्रपटातील बिल्ली बिल्ली गाणे रिलीज करण्यात आले आहे. सलमानने व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्सचा पाऊस पाडला आहे.

सलमान खानच्या टायगर 3 मधील बिल्ली बिल्ली गाणे रिलीज
सलमान खानच्या टायगर 3 मधील बिल्ली बिल्ली गाणे रिलीज

मुंबई - सलमान खान आणि पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेल्या कौटुंबिक 'किसी का भाई किसी की जान' या मनोरंजक चित्रपटामधील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. इंस्टाग्रामवर सलमानने 'बिल्ली बिली' या नव्या गाण्याची लिंक शेअर केली आहे. 'खात्री आहे की हे गाणे तुमच्या पसंतीस पडेल आणि हास्य आणि डान्स तुम्हाला सकारात्मक उर्जा तुम्हाला देईल', असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

लोकप्रिय पंजाबी गायक सुखबीर याने गायलेले हे एक पेप्पी डान्स नंबर गाणे गीतकार कुमार यांनी लिहिले आहे. रिलीज झालेल्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये, सुपरस्टार सलमान एका काळ्या-पांढऱ्या सूटमध्ये डॅशिंग दिसत आहे, तर लाल रंगाच्या पोशाखात अभिनेत्री पूजा हेगडेसोबत परेक्षकांना आकर्षित करताना दिसत आहे. सलमानने व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने कमेंट केली,धन्या पावलो. आणखी एका चाहत्याने लिहिलंय की 'हे धमाल गाणे झालंय भाईजान.'

अलिकडेच टायगर ३ च्या निर्मात्यांनी 'नियो लगदा' या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे लॉन्चिंग केले ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटामध्ये पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

यापूर्वी सलमानने किसी का भाई किसी की जान चित्रपटाचा दमदार टीझर शेअर केला होता. एका दमदार संवादातून त्याने या चित्रपटातील आपल्या भूमिकेची ओळख करून दिली होती. या संवादात पूजा हेगडे त्याला विचारते, तुझे नाव काय आहे. यावर सलमान म्हणतो की, मला नाव नाही, पण मला भाईजान म्हणतात. किसी का भाई किसी की जान चित्रपट यंदाच्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीसाठी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सलमानकडे कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत 'टायगर 3' हा चित्रपटही आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुख खानची एक कॅमिओ भूमिका असणार आहे. शाहरुख खान टायगर 3 चित्रपटासाठी एप्रिलच्या अखेरीस शूट करणार आहे आणि शाहरुखचे शूटिंग मुंबईत होणे अपेक्षित आहे. या शूटचे तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून टायगर 3 मध्ये जेव्हा दोन जिगरबाज सुपर स्पाईज पुन्हा भेटतात तेव्हा धमाकेदार फटाक्यांची आतषबाजी होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा -Kiara Advani With Her Bridesmaids : कियारा अडवाणी आणि ईशा अंबानी यांचे न पाहिलेले फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details