हैदराबाद - दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे नयनतारा आणि विघ्नेश शिवन नुकतेच सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. या गुड न्यूजमुळे एकीकडे या जोडप्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती, तर दुसरीकडे या जोडप्यावर सरोगसीचे नियम मोडल्याचा आरोप होत होता. यानंतर हे जोडपे चौकशीला सामोरे गेले. आता तामिळनाडू सरकारला तपासाअंती आढळून आले आहे की या जोडप्याने भारतात अस्तित्वात असलेल्या सरोगसीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
खरं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारच्या टीमचे म्हणणे आहे की या जोडप्याने सरोगसीचे कोणतेही नियम मोडलेले नाहीत. या संदर्भात, तामिळनाडू सरकारने 3 सदस्यांचे पॅनेल तयार केले होते, ज्यांची निवड आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातून करण्यात आली होती.
पॅनलने सादर केला अहवाल- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅनलने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर बुधवारी आपला अहवाल सरकारला सादर केला. अहवालानुसार, या जोडप्याने सरोगसीचा कोणताही नियम मोडला नाही, मात्र तपासात असे आढळून आले आहे की, जोडप्याला सरोगसीची सुविधा देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल.