महाराष्ट्र

maharashtra

'भक्षक' चित्रपटात भूमी पेडणेकर दिसेल एका शोध पत्रकाराच्या भूमिकेत

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 2:22 PM IST

Bhakshak Teaser: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं 'भक्षक' या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत भूमी पेडणेकर दिसणार आहे.

Bhakshak Teaser
भक्षक टीझर

मुंबई - Bhakshak Teaser: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं तिच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीजच्या बॅनरखाली 18 जानेवारी रोजी 'भक्षक' या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. 'भक्षक'या चित्रपटात भूमी पेडणेकर एका शोध पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेसह रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये न प्रदर्शित होता थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. दरम्यान 'भक्षक' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये भूमीची दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'भक्षक' चित्रपटाबद्दल : 'भक्षक' हा एक क्राईम ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुलकित यांनी केलंय. गौरी खान आणि गौरव वर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज बॅनरखाली करण्यात आली आहे. 'भक्षक'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटात भूमीसह संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'भक्षक'ची कहाणी एका महिला पत्रकारवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये वैशाली सिंग पत्रकारच्या भूमिकेत भूमी पेडणेकर दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार? : 'भक्षक'च्या टीझरमध्ये भूमी ही सिंपल लूकमध्ये आहे. दरम्यान टीझरच्या शेवटी भूमी एका मुलीला म्हणताना दिसत आहे की, ''आम्ही मुलांच्या हक्कासाठी लढतोय, समजलं का?'' एका निवेदनात चित्रपटाचे दिग्दर्शक पुलकित म्हणाले होते की, ''समाजातील कटू सत्य समोर आणणे आणि प्रभावी बदल घडवून आणू शकतील अशा संवादांना प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश होता. मला आशा आहे की या महत्त्वपूर्ण चर्चेत आणखी लोक सामील होतील.'' 'भक्षक' हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रवाहित होईल. भूमीचा टीझरमधील हा अंदाज पाहून अनेकजण तिचे सोशल मीडियावर कौतुक करताना दिसत आहे. भूमीला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

  1. आजोबा एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहताना ज्युनियर एनटीआरच्या डोळ्यात तरळले अश्रू
  2. हेमा मालिनीचा रामनगरी अयोध्येत नृत्याविष्कार, नृत्यनाट्यात लाकारली माता सीतेची भूमिका
  3. महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं देशांतर्गत 100 कोटीचा टप्पा केला पार

ABOUT THE AUTHOR

...view details