महाराष्ट्र

maharashtra

Tunisha Sharma Suicide Case : मृत्यूपूर्वी तुनिषा-शीझान यांच्यात झाले होते जोरदार भांडण, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

By

Published : Dec 30, 2022, 4:46 PM IST

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूचे (Tunisha Sharma Suicide Case) कारण शोधण्यापेक्षा आत्महत्या प्रकरण आरोप-प्रत्यारोप तसेच धर्माच्या मतभेदांमध्ये अडकताना दिसताना तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी वालीव पोलीस म्हणाले, मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद (argument between Tunisha and Sheezan) झाला होता. वाद झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी (CCTV footage seized by police) जप्त केले आहे.

Tunisha Sharma Suicide Case
मृत्यूपूर्वी तुनिषा - शीझान यांच्यात जोरदार वाद

मुंबई :आज तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत शिझानने तुनिषासोबत जवळीक ( Tunisha Sharma mother allegation on Sheezan Khans ) वाढवली. तिचा फायदा घेतला आणि नंतर तिचा विश्वासघात केला असे त्यांनी म्हटले आहे. इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणायचा. त्याशिवाय तो ड्रग्स घ्यायचा असे तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषदेत ( Sheezan Khans drug addiction and Islam conversion ) म्हटले आहे.

शीजानकडून तुनिषाला मारहाण :तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी वालीव पोलीस म्हणाले, मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद झाला (argument between Tunisha and Sheezan) होता. वाद झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी (CCTV footage seized by police) जप्त केले आहे. आजमीडियाशी बोलताना तुनिषाची आई वनिता शर्मा, शीझानचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याची तुनिषाला आधीच माहिती होती. शीझानने (Sheezhan Khan) तुनिशाला मारहान देखील केली होती असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

तुनिषाचा फायदा घेतला : मालिकेच्या सेटवर आधी तिच्याशी जवळीक वाढवली. तिचा विश्वास कमावला. शिझानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. महागड्या भेटवस्तू तुनिषाने ( Sheezan Khan Took Tunisha Sharma Advantage ) दिल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी केल्या, जसे की टॅटू काढणे, घरात कुत्रा पाळणे तरीही त्यांनी ते केलं. कारण शिझान आणि त्याच्या कुटूंबाने तुनिषाला हिप्नोटाईज केल्या सारखं केल होतं. ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यांच्या गोष्टींना प्राधान्य देत होती. सगळ मिळाल्यावर तिच्याशी ब्रेकअप केले. ब्रेकअपच्या वेळी तिला कानाखाली मारली होती. तेव्हा ती खूप रडली. तिला खूप त्रास झाला. शिझानचे आधीच दुसऱ्या मुलीसोबत रिलेशन होते. असे असतानाही त्याने तुनिषासोबत नाते का बनवले. माझी गाडी तो वापरायचा. त्याने वापर केलेल्या गाड्यांचे आणि ड्रायव्हरचे 50 हजारांचे मी बील भरले आहे.

हत्येचा संशय :गळफास घेतल्यावर मला सेटवरू फोन आला. मी लगेच रिक्षा करून आले. तिला फासावरून उतरवल्यावर लगेच रूग्णवाहिका बोलावली नव्हती. रूग्णवाहिकेला का बोलावले नाही. 15 मिनिटांनी रूग्णवाहिका आली होती. इतका वेळ का लागला. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तुनिषाच्या हत्येसंबंधीत शिझानच्या कुटूंबावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे तुनिषाच्या आईने म्हटले ( Tunisha murder Suspect) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details