पुणे: गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त (Unrestricted celebration)असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया (Ganpati bappa morya) मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. ढोल-ताशांचा आवाज, हजारोंच्या तोंडी बाप्पाचे नाव आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. एकीकडे राज्यात संत्तासंघर्ष सुरू असताना पुण्यात गणेश विसर्जनावेळी (Ganesh immersion) राजकीय वैर बाजूला ठेऊन नेते एकत्र येताना दिसले.
Ganeshotsav 2022 : राजकीय वैर बाजूला ठेऊन नेते झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी
राजकीय वैर बाजूला ठेऊन नेते झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी(Kasba Ganapati's palanquin). गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त (Unrestricted celebration) असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया (Ganpati bappa morya) मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. ढोल-ताशांचा आवाज, हजारोंच्या तोंडी बाप्पाचे नाव आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. एकीकडे राज्यात संत्तासंघर्ष सुरू असताना पुण्यात गणेश विसर्जनावेळी (Ganesh immersion)राजकीय वैर बाजूला ठेऊन नेते एकत्र येताना दिसले.
चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे गणेश विसर्जनावेळी एकत्र - एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडून भाजपसोबत सत्तास्थापना केली. त्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात आज भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे गणेश विसर्जनावेळी एकत्र दिसले.आणि हे दोन्ही नेते कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी झाले. आज पुण्यात विसर्जन मिरवणूक जेव्हा सुरू झाली तेव्हा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील,विरोधी पक्ष नेते अजित पवार,माजी मंत्री आदित्य ठाकरे,आमदार रोहित पवार विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे, विधान परिषद सदस्य आणि पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नेत्यांनी दिला पालखीला एकत्रित खांदा- गणेश विसर्जनावेळी गर्दीतून रस्ता काढत आदित्य ठाकरे हे मानाचा पहिला गणपती कसबा पेठ येथे पोहोचले. येथे त्यांची सर्वजण वाट पाहत होते. यानंतर कसबा गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी राजकीय भेदाभेद बाजूला सारुन आदित्य ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांनी पालखीला एकत्रित खांदा दिला. यावरून राजकीय वैर बाजूला ठेऊन राज्यातील दोन विरोधी नेते एकत्र येताना दिसले.