महाराष्ट्र

maharashtra

Covidelta Testing Kit : डेल्टा अन् ओमायक्रॉन प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी भारतीय बनावटीचा चाचणीसंच विकसित

By

Published : Dec 18, 2021, 9:22 PM IST

Updated : Dec 18, 2021, 10:21 PM IST

पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोरोनाच्या ( Corona Update ) डेल्टा ( Delta Variant ) व ओमायक्रॉन ( Omicron Variant ) प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच ( Covidelta Testing Kit ) विकसित करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे ते ओळखणे आता शक्य होणार आहे.

कोविडेल्टा
कोविडेल्टा

पुणे - येथील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या ( GenePath Diagnostics ) वतीने कोरोनाच्या ( Corona Update ) डेल्टा ( Delta Variant ) व ओमायक्रॉन ( Omicron Variant ) प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच ( Covidelta Testing Kit ) विकसित करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे ते ओळखणे आता शक्य होणार आहे.

माहिती देताना डॉ. कविता खतोड

चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा

या संशोधनाद्वारे कोरोनाचा नेमका प्रकार ओळखणे सोपे झाले आहे. या चाचणीसंचाच्या डेल्टा व ओमायक्रॉन सोबतच या विषाणूच्या इतर प्रकाराची ओळख पटविणे शक्य झाले आहे. चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेत विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ( ICMR ) मान्यताही त्याला मिळाली आहे.

पुण्यातील पहिल्या बाधित रुग्णाची तपासणी या किटद्वारे

या चाचणीसंचाच्या मदतीने पुण्यातील ओमायक्रॉनग्रस्त रुग्णाची ( Omicron Patients In Pune ) चाचणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुढे हा रुग्ण हा ओमिक्रॉन प्रकारानेच बाधित असल्याची पुष्टी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ( NCL ), बी.जे. मेडिकल कॉलेज व पूना नॉलेज क्लस्टर ( PKC ) सारख्या संस्थांनीही केली. सध्या भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सरकारी आणि खासगी संस्था या कोविड विषाणूच्या प्रकारांच्या निदानासाठी व त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या चाचणीसंचाच्या वापराचे मूल्यांकन करत आहेत.

डेल्टा व ओमायक्रॉन प्रकारातील फरक समोर आणण्यास ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरेल

या चाचणीसंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारातील बीए 1 व बीए 2 सोबत नवीन येत असलेला बीए 3 आणि ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील ठळक फरक ओळखता येतो. सर्व ओमिक्रॉन प्रकारात काही सामाईक उत्परिवर्तन दिसून येते. कोरोना विषाणुत होणारे बदल समजून डेल्टा व ओमायक्रॉन प्रकारातील फरक समोर आणण्यास ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरेल, असे यावेळी बिझनेस डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्ष डॉ. कविता खतोड यांनी सांगितले.

हे ही वाचा -HGCO 19 vaccine : तिसरा डोस देण्याची वेळ आली तर एचजीकॉ 19 लसीला प्राधान्य मिळू शकेल - डाॅ. भोंडवे

Last Updated :Dec 18, 2021, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details