महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Death anniversary of Mahatma Gandhi : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने काँग्रेसची बाईक रॅली, व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटाचा विरोध

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ( Death anniversary of Mahatma Gandhi ) पुणे शहर काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन ते महात्मा गांधी पुतळा पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत ( Pune Railway Station ) शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी दुचाकी रॅली ( Bike Rally ) काढण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रघुपती राघव राजाराम या भजनाचा पठण करण्यात आले.

काँग्रेस
काँग्रेस

By

Published : Jan 30, 2022, 1:14 PM IST

पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ( Death anniversary of Mahatma Gandhi ) पुणे शहर काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन ते महात्मा गांधी पुतळा पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत ( Pune Railway Station ) शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी दुचाकी रॅली ( Bike Rally ) काढण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रघुपती राघव राजाराम या भजनाचा पठण करण्यात आले.

बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त आज (दि. 30 जानेवारी) सर्वत्र महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात येत आहे. पण, काही जातीयवादी संघटना आणि पक्ष हे महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचा उदात्तीकरण करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे ( Congress City President of Pune ) यांनी व्यक्त केले.

चित्रपट प्रदर्शनाला विरोध करणार -'व्हाय आय किल्ड गांधी' ( Why I Killed Gandhi ) या चित्रपटात नथुराम गोडसे ( Nathuram Godse ) यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) नव्या वादात सापडले आहेत. त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला आमचा विरोध असून पुणे शहरात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

हेही वाचा -Car Accident : पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details