महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Local Body Election 2022 : पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

ओबीसी आरक्षण लागू करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून पावसाळ्यानंतर या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्यात सध्याच्या घडीला जून महिन्यात 186 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

Goa Election
फाईल फोटो

By

Published : Jun 1, 2022, 4:29 PM IST

Updated : Jun 1, 2022, 8:04 PM IST

पणजी - ओबीसी आरक्षण लागू करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून पावसाळ्यानंतर या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्यात सध्याच्या घडीला जून महिन्यात 186 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षण अभावी निवडणुका घेण्यास सरकार तयार नसल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत

ट्रिपल टेस्टनंतर निवडणुका घेण्यात येणार - स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना आरक्षण देऊन निवडणुका घेण्यात याव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता . त्यानुसारच या निर्णयाला अनुसरून राज्य सरकारने ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला फाईल पाठविले असून त्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्या ओबीसी आरक्षण लागू करून पावसाळ्यानंतर या निवडणुका घेण्यात येतील व त्यासंबंधीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार असल्याचा मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

जून महिन्यात 186 ग्रामपंचायतींची मुदत समाप्त - जून महिन्यात राज्यातील 186 ग्रामपंचायतीचे मुदत समाप्त होणार असून 4 जून ते 18 जून दरम्यान या निवडणुका घेण्याचा राज्यसरकारने ठरविलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी आरक्षण लागू करून त्यानुसारच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे सरकारने यासंबंधीची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली असून पावसाळा नंतरच ओबीसी आरक्षणाचा मसुदा तयार करून निवडणुका घेण्यात येणार येणारं आहेत.

Last Updated : Jun 1, 2022, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details