महाराष्ट्र

maharashtra

Raju Shetti Request To Governor : 'त्या' 12 आमदारांच्या यादीतून मला वगळा, राजू शेट्टींची राज्यपालांना विनंती

By

Published : Apr 8, 2022, 3:19 PM IST

Updated : Apr 8, 2022, 3:33 PM IST

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांना आपलं नाव बारा आमदारांच्या यादीतून वगळण्याची विनंती केली आहे. नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

मुंबई -राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांमधून आपले नाव वगळावे, अशी विनंती माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांना केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून आपण सर्व संबंध तोडून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतीच केली आहे. या घोषणेनंतर महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या यादीत आपले नाव असणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे हे नाव वगळण्याची विनंती राज्यपालांकडे शेट्टी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी
'राज्यपाल नियुक्त सदस्य चेष्टेचा विषय' :दरम्यान गेल्या एक वर्षापासून राज्यपाल नियुक्त नावाबाबत गोड सुरू असून अद्याप त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या यादीबाबत सध्या चेष्टेचा विषय झाला आहे. राजा टिंगल-टवाळीचा विषय बनलेल्या अशा यादीत आपले नाव असणे आपल्याला योग्य वाटत नाही, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
Last Updated :Apr 8, 2022, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details