मुंबई -आर्यन खान (aryan khan) याचा ड्रग्ज प्रकरणाशी (drugs case) किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही, असे निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) नोंदवले आहे. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी या प्रकरणात पुन्हा बनाव असल्याचा आरोप केला आहे. आज (दि. 20) उच्च न्यायालयाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आपण सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते, असे म्हणत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. आता समीर वानखेडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील. मात्र, रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे. अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.