महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Bogus Doctor : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, चार बोगस डॉक्टर आणि एका कंपाऊंडरला अटक

अलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या चार डॉक्टर आणि एका कंपाऊंडरला गुन्हे शाखेने अटक केली ( Four Doctor And One Compounder Arrested ) आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस) पदवीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

mumbai crime branch
mumbai crime branch

By

Published : Feb 13, 2022, 4:01 PM IST

मुंबई -बेकायदेशीरपणे अलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या चार डॉक्टर आणि एका कंपाऊंडरला अटक करण्यात आली ( Four Doctor And One Compounder Arrested ) आहे. गुन्हे शाखेच्या युनिट - १० ने ही कारवाई ( Mumbai Crime Branch ) केली आहे. पाचही आरोपी गोरेगाव पश्चिम येथील प्रेम नगर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत.

इब्रार सय्यद (२४), डॉ सर्वेश यादव (३१), डॉ छोटेलाल यादव (३३), डॉ ओमप्रकाश यादव (४५) आणि डॉ सपना यादव (२९) अशी या पाच जणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम नगर येथील डॉ. मुकेश यादव यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारा कंपाऊंडरला सय्यद हा डॉ यादव यांच्या अनुपस्थितीत रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता. तेव्हा पोलिसांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रॅक्टिस करताना पकडले.

त्याच्याव्यतिरिक्त पोलिसांनी अन्य डॉक्टरांच्या पदव्या तपासल्या. तेव्हा आयुर्वेद आणि होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस) पदवीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे होते. मात्र, कोणाकडेही अलोपॅथीशी संबंधित कागदपत्रे नव्हती. त्यामुळे सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांच्याकडून स्टेथोस्कोप, इंजेक्शन, सिरिज, रबर स्टॅम्प, प्रिस्क्रिप्शन बुक आणि त्यांची प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. या पाच जणांवर फसवणूक आणि जीव धोक्यात आणल्या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्याच्या कलम ३३ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut On Bjp : संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, "ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून..."

ABOUT THE AUTHOR

...view details