मुंबई - राज्यात सध्या भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापले आहे. राज ठाकरे यांना पुढे करून भाजप आपले आपले मनसुबे पूर्ण करत असल्याचा आरोप सध्या महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. त्यातच काल आपल्या भूमिकांवर ठाम राहत राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी ही लढाई एक दिवसापुरती नसून ही दीर्घकाळ चालणारी लढाई असल्याचे म्हटले. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'बाळासाहेब एक उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यानंतर राज ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. पण, भाजपने एका चांगल्या व्यंगचित्रकाराचे हात कलम ( Sanjay Raut On Raj Thackeray ) केले.' अशी टीका राऊत यांनी ( Sanjay Raut Criticized BJP ) केली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
नेमके काय म्हणाले राऊत? - यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "मी सध्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे. संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही दौरे करतो. काल ज्या प्रकारचा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने त्यानुसार 18 महानगरपालिकांच्या निवडणुका तात्काळ घेण्याच्या सूचना आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी ही चालूच होती, त्याला वेगाने पावले टाकावे लागतील. जे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करत आहोत. 14 तारखेला बीकेसीमध्ये शिवसेनेची मोठी सभा आहे. त्यानंतर औरंगाबादेत आठ तारखेला सभा आहे, त्याची तयारी सुरू आहे." असेही ते यावेळी म्हणाले.