महाराष्ट्र

maharashtra

Fraud of MLAs : शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाने 100 कोटींची मागणी; चारही आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Jul 20, 2022, 9:53 PM IST

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद ( Cabinet Ministership ) देण्याच्या नावाखाली आमदाराला ( MLA ) 100 कोटी रुपयेची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली होती. या आरोपींना आज किल्ला कोर्टात हजर केले असता 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

All four accused in police custody till July 26
चारही आरोपींना 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई -राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार ( Chief Minister Eknath Shinde ) अस्तित्वात आल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला 100 कोटी रुपयेची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली होती. या आरोपींना आज किल्ला कोर्टात हजर केले असता 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आरोपींच्या वकिलांनी आरोप फेटाळले

ओबेरॉय हॉटेलमध्ये सापळा रचून चार आरोपींना अटक - दरम्यान,मंत्रीमंडळात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना ( MLA ) एजेंट किंवा आरोपी फोन करून हेरत आहेत. मुंबई गुन्हे शाखेने ( Mumbai Crime Branch ) अटक केलेल्या आरोपींनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार राहुल कुल ( MLA Rahul Kul ) यांना भेटण्यासाठी आले होते. मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी 100 कोटी मागितल्याचे आरोपींनी कुल यांना सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये ( Oberoi Hotel ) आमदाराची भेट घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम उद्या द्यावे लागतील असे सांगितले. मात्र, पैसे घेण्यासाठी आमदाराने आरोपींना मुंबईच्या ऑबेरॉय हॉटेलमध्ये बोलावले. मुंबई पोलिसांनी ओबेरॉय हॉटेलमध्ये सापळा रचून चार आरोपींना अटक केली. मात्र, आरोपींच्या वकिलांनी वरील सर्व आरोप हे फेटाळून लावले आहेत.


हेही वाचा -Deepak Kesarkar : 'मातोश्री, शिवसेना भवनावर दावा केला नाही, परंतु...'; दीपक केसरकरांनी स्पष्टचं सांगितलं

आमदारांच्या फसवणुकीचा प्रयत्न - राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. असून मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन, सागर या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. मंत्रीपद देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट ( Nariman Point ) परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्यावेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपीची नावे समोर आली आहे.


फसवणुकीचा गुन्हा दाखल -आमदारा राहुल कुल यांच्या खाजगी सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार मरीन लाईन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत रियाज अल्लाबक्ष शेख (41), कोल्हापूर, योगेश मधुकर कुलकर्णी (57), पाचपाखाडी, ठाणे, सागर विकास संगवई (37), पोखरण रस्ता, ठाणे व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(53) नागपाडा मुंबई अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा -CM Eknath Shinde : 'ओबीसी जनतेसाठी मोठा दिलासा, राज्यात ओबीसी आरक्षणासहित निवडणूक '

ABOUT THE AUTHOR

...view details