मुंबई -मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa Recitation ) आणि मशिदीवरील भोंगे यावरुन राजकारण पेटले आहे. त्यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला आहे. श्रद्धा ही स्टेजवर दाखवायचे नसते ती हृदयात असते, असा टोला आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला ( Aaditya Thackeray On MNS ) आहे. गिरगाव येथील संकटमोचन मंदिरात आदित्य ठाकरेंनी हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचे काम बी आणि सी टीम करत आहे. हिंदुत्व ही श्रद्धेची गोष्ट आहे. राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व करत नाही. 'रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये,' हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत. मात्र, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी आणि सी टीमला जनतेने जास्त महत्त्व देऊ नये, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला आहे.