कोल्हापूर - केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. केंद्राच्या कायद्याला विरोध करणारा कायदा केल्याशिवाय विरोध करणे म्हणजे केवळ दादागिरी सुरू असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारला कायदे कळत नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारला कायदा कळत नाही : चंद्रकांत पाटील
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.
शिवाय एखाद्या कायद्याला विरोध करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्या पद्धतीचा कायदा करून तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवण्यात येतो. मात्र, अशा पद्धतीचा कोणताच कायदा राज्य सरकारने केला नाही. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही, हे ते म्हणूच शकत नाहीत. मात्र, त्यांची ही केवळ दादागिरी सुरू असल्याची टीका पाटील यांनी केली. शिवाय राज्य सरकारला पूर्ण कायदा समजत नसल्याची खिल्लीसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उडवली.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.