महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कालवडची लस टोचली मोठ्या जनावरांना; टाकरखेड पूर्णा येथील धक्कादायक प्रकार

चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथील सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी चक्क गोट पॉक्सची लस समजून कालवडींना दिली जाणारी बुसिलॉसिस नावाची लस चक्क मोठ्या जनावरांना टोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Wrong vaccination to cow in amravati).

कालवडची लस टोचली मोठ्या जनावरांना
कालवडची लस टोचली मोठ्या जनावरांना

By

Published : Sep 14, 2022, 4:04 PM IST

अमरावती - आसेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सोमवारी पंचायत समिती मार्फत दवाखान्याला सोमवारी पंचायत समितीमार्फत बुसिलॉसिस या लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात सध्या या लंपी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण केले जात आहे. आसेगाव पूर्णा येथील सहाय्यक पशुधन अधिकारी डॉक्टर एस.आर. सातव यांनी दवाखान्यात प्राप्त झालेली लस गोट पॉक्स आजारावरील लस असल्याचे समजून कालवडींना दिली जाणारी बुसिलोसिस नावाची लस मोठ्या जनावरांना टोचली. जवळपास १५० मोठ्या जनावरांना बुसिलॉसिस लस टोचली आहे. विशेष म्हणजे ही लस ६ ते १९ महिन्यांपर्यंतच्या कालवडींना दिली जाते. परंतु सहायक पशुधन अधिकाऱ्यांनी लम्पी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी गोट पॉक्सचे लसीकरण केले जात आहे असे सांगितले.


राज्यात लंपी जनावरांच्या साथ रोगाचा कहर सुरू असताना त्याचे लोन अमरावती जिल्ह्यासह चांदूरबाजार तालुक्यात पसरले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील खराळा येथे ३० च्या जवळपास जनावरे या साथीच्या रोगाने ग्रस्त असल्याची माहिती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांनी दिली. संपूर्ण जिल्ह्यातील १२ गावतील ३१४ जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. चांदूरबाजार तालुक्यातील खराळा गावात लंपीचे ३० च्या वर जनावरे या साथीच्या रोगाने ग्रस्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांच्या साथीचा उद्रेक झाला असतानासुद्धा स्थानिक पशुधन अधिकाऱ्यांनी मात्र गुरांचा बाजार बंद करण्याची सूचना बाजार प्रशासनाला केली नाही. आ. बच्चू कडू यांना हे कळतात त्यांनी पशुधन विभागाची चांगलीच कान उघडणी केली आणि बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

जनावरांचे लसीकरण करून घ्यावे -पशुधन मालकांनी आपल्या जनावरांचे वेळेतच लसीकरण करून घ्यावे जेणेकरून साथ रोगास अटकाव घालता येईल. लंपीचे भय न बाळगता आपल्या सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे यासाठी जिल्ह्यात ४० हजार लसी उपलब्ध असल्याची माहिती आ.कडू यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details