नवी दिल्ली- सोन्याचे दर बुधवारी दोन महिन्यात सर्वात कमी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दर वधारले आहेत. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ५२६ रुपयांनी वाढून ४६,३१० रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयांची घसरण या कारणांनी सोन्याच्या किमती देशात उतरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४५,७८४ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १,२३१ रुपयांनी वधारून ६८,६५४ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,४२३ रुपये होता.
हेही वाचा-VIDEO: गावात शिरली मगर, रस्त्यावरुन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल
या कारणाने सोन्याच्या दरात वाढ
- कोमेक्समध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
- दुसरीकडे रुपयाचे दर डॉलरच्या तुलनेत घसरले आहेत.
- अशा स्थितीत दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर ५२६ रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
- रुपयाचे मूल्य गुरुवारी डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ७४.३७ रुपये आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस १,७७८ डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.२५ डॉलर आहेत.