महाराष्ट्र

maharashtra

औद्योगिक उत्पादनात जानेवारीत २ टक्क्यांची वृद्धी

By

Published : Mar 12, 2020, 7:01 PM IST

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर जानेवारीत १.५ टक्के राहिला आहे. तर गतवर्षी उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर हा १.३ टक्के होता.

Representative
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक बातमी आहे. औद्योगिक उत्पादन जानेवारीत २ टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन क्षेत्राची कामगिरी खराब झाली असतानाच औद्योगिक उत्पादन वाढले आहे.

गतवर्षी जानेवारीत औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) १.६ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर जानेवारीत १.५ टक्के राहिला आहे. तर गतवर्षी उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर हा १.३ टक्के होता. वीज निर्मितीचा वृद्धीदर हा ३.१ टक्के राहिला आहे. तर गतवर्षी जानेवारीत वीजनिर्मितीचा वृद्धीदर हा केवळ ०.९ टक्के होता.

हेही वाचा-कोरोनाने देशातील विविध उद्योगांना उतरती 'कळा'

खाण उद्योग क्षेत्राचा वृद्धीदर हा ४.४ टक्के आहे. तर गतवर्षी ३.८ टक्के खाण उद्योगाचा वृद्धीदर होता. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीत औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा ०.५ टक्के राहिला आहे. तर वर्ष २०१८-१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा ४.४ टक्के होता.

हेही वाचा-मंदीची भीती; मुंबई शेअर बाजारात २००८ नंतर सर्वात मोठी घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details