महाराष्ट्र

maharashtra

ठरलं! संसदेच्या नव्या इमारतीचे कंत्राट 'या' कंपनीकडे ; ८६१.९० कोटींचा येणार खर्च

By

Published : Sep 16, 2020, 9:06 PM IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना महत्त्वाची बातमी आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम देशातील सर्वात जुना उद्योग समूह असलेला टाटा समूह करणार आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली- संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे काम टाटा प्रोजेक्ट लि. कंपनीला मिळाले आहे. हे संसदेच्या इमारतीचे कंत्राट टाटा कंपनी ८६१.९० कोटी रुपयांमध्ये पूर्ण करणार आहे.

टाटाला स्पर्धक असलेल्या एल अँड टी कंपनीने संसदेच्या बांधकामासाठी ८६५ कोटी रुपयांची निविदा भरला होती. त्यापेक्षा कमी म्हणजे ८६१.९० कोटींची निविदा भरणाऱ्या टाटा प्रोजेक्टला संसदेच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे.

नव्या इमारतीचे बांधकाम हे सध्या असलेल्या इमारतीजवळ करण्यात येणार आहे. हे काम सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम २१ महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विकासाच्या (सीपीडब्ल्यूडी) माहितीनुसार पार्लिमेंट हाऊस एस्टेटच्या प्लॉट क्रमांक ११८ वर संसदेची नवीन इमारत बांधली जाणार आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या संसदेची इमारत वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, संसदेच्या इमारतीचा पुनर्विकास हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी गुजरातच्या एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट कंपनीला सल्लागार म्हणून कंत्राट देण्यात आले आहे. सध्याच्या संसदेमध्ये मंत्र्यांना बसण्यासाठी कक्ष आहेत. मात्र खासदारांना तसेच त्यांचा कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. नव्या रचनेत खासदारांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे त्यांना संसदेमध्ये बसून सरकारी काम करता येणे शक्य होणार आहे. संसदेची नवी इमारत ही पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असणार आहे .सेंट्रल व्हिस्टा हे जागतिक पर्यटक व अभ्यागतांसाठी (व्हिझिटर) आकर्षण केंद्र ठरण्यासाठी या भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details