रियाध- येमेनच्या बंडखोरांनी दोन अॅरेमॅको तेल प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन तात्पुरते थांबविले आहे. त्यामुळे देशाच्या एकूण तेल उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाल्याचे उर्जा मंत्र्यांनी सांगितले.
अब्क्वेक आणि खुरैस प्रकल्पामधील उत्पादन प्रकल्पावर हल्ला झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्पादन तात्पुरते थांबवावे लागल्याचे उर्जा मंत्री राजकुमार अब्दुलअजीझ बिन सलमान यांनी सांगितले.
अॅरॅम्को ही सौदी सरकारची तेल कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ अमीन नसीर यांनी काम पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया अद्ययावत होईल, असे त्यांनी सांगितले. दोन्ही तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा-एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत गोंधळ!