महाराष्ट्र

maharashtra

संसदेत आतापर्यंत किती खासदारांचं झालं निलंबन; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 8:45 PM IST

MPs Suspended from Lok Sabha : संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांचं निलंबन सुरूच आहे. आजही सभागृहाचा अवमान केल्याच्या आरोपावरुन काँग्रेसच्या आणखी तीन खासदारांना चालू हिवाळी अधिवेशनातून लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केलंय.

MPs Suspended from Lok Sabha
MPs Suspended from Lok Sabha

नवी दिल्ली MPs Suspended from Lok Sabha : लोकसभेतून आणखी तीन खासदारांना निलंबित करण्यात आलंय. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डी के सुरेश आणि दीपक बैज यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित केलंय. त्यामुळं निलंबित खासदारांची संख्या आता 146 झालीय. यापैकी एकूण 100 खासदार लोकसभेतील आहेत.

  • प्रश्नोत्तराचा तास संपताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीन खासदारांची नावं घेत तुम्ही सभागृहाचं कामकाज वारंवार विस्कळीत करत असून, फलक दाखवत घोषणाबाजी करत आहात. तसंच कागदपत्रे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे सभागृहाच्या शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचं म्हणाले.

काय म्हणाले ओम बिर्ला : घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचं नाही. जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय. तुम्हाला इथं चर्चा करण्याचा आणि तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा, मी तुम्हाला शून्य तासात तुमचं मत मांडण्याची संधी देईन.

आतापर्यंत कधी आणि किती खासदारांच निलंबन : सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 14 डिसेंबरला 13 खासदार, 18 डिसेंबरला 33, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 1 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांनी आज दिल्लीतील विजय चौकात मोर्चा काढून सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केलाय. त्याचवेळी विरोधी पक्ष सातत्यानं सभागृहाची शिष्टाई मोडत असल्याचे सरकारनं म्हटलंय. 13 डिसेंबर रोजी दुपारी संसदेच्या सुरक्षेतील एक मोठी त्रुटी समोर आली होती. जेव्हा लोकसभेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि कॅनमधून धूर पसरवला होता. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आलीय.

  • नियोजित वेळापत्रकानुसार 22 डिसेंबर शुक्रवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. मात्र, आजच एक दिवस आधी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; आता 'यांच्याकडे' संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी
  2. खासदार निलंबन प्रकरण : विरोधकांचं आक्रमक आंदोलन, शरद पवारांचाही आंदोलनात सहभाग

ABOUT THE AUTHOR

...view details