महाराष्ट्र

maharashtra

Wrestlers Protest : साक्षी मलिक, बबिता फोगटमध्ये ट्विटरवॉर, साक्षी मलिककवर गंभीर आरोप

By

Published : Jun 18, 2023, 8:12 PM IST

Updated : Jun 18, 2023, 10:32 PM IST

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, या संदर्भातील वाद अजूनही थांबलेला नाही. आता याप्रकरणी दोन महिला कुस्तीपटू आमनेसामने आल्या आहेत.

Wrestlers Protest
Wrestlers Protest

नवी दिल्ली : साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांनी एका व्हिडिओमध्ये भाजप नेत्या आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगटवर आरोप केले होते. बबिता यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. माजी कुस्तीपटू बबिता फोगटने ऑलिम्पियन साक्षी मलिकवर "काँग्रेसच्या हातातील बाहुले" असल्याचा आरोप केला आहे.

कुस्तीपटूंमध्ये फुट? : ऑलिंपियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह महिला कुस्तीपटूंचा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचावर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू गेल्या काही दिवसापांसून आंदोलन करीत आहेत. शनिवारी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, साक्षी मलिकचा पती सत्यव्रत कादियान, मलिकच्या शेजारी बसलेला दिसत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा निषेध राजकीय हेतूने प्रेरित नव्हता. निदर्शनास भाजपशी संबंधित दोन व्यक्तींनी, माजी कुस्तीपटू बबिता फोगट आणि तीरथ राणा यांनी परवानगी घेतली होती.

ट्विटरवॉर :प्रत्युत्तरात बबिता फोगटने रविवारी हिंदीत ट्विट करून सांगितले की, "काल मला खूप वाईट वाटले. मी माझ्या धाकट्या बहिणीचा, तिच्या नवऱ्याचा व्हिडिओ पाहत असताना हसले. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छिते की परवानगीचे कागद जी धाकट्या बहिणीने दाखवली होते त्यावर कुठेही माझी स्वाक्षरी स्वाक्षरी नव्हती. संमतीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे माझ्या या घटनेशी काहीही दुर पर्यंत संबंध नसल्याचे तीने म्हटले आहे.

साक्षी मलिकवर गंभीर आरोप : भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी बबिता फोगटने यांनी साक्षी मलिक काँग्रेसच्या हातातील कठपुतळी असल्याचा आरोप केला आहे. 'तुम्ही बदामाच्या पिठाची रोटी खात असाल, पण मी आणि माझ्या देशातील जनताही गव्हाची रोटी खातो, हे सर्वांना समजले आहे. तुम्ही काँग्रेसच्या हातातील बाहुले बनला आहात, हे देशातील जनतेला समजले आहे. आता वेळ आली आहे की, तुम्ही तुमचा खरा हेतू सांगावा. कारण आता जनता तुम्हाला प्रश्न विचारत आहे' असे ट्विट बबीता फोगट यांनी केले आहे.

हेही वाचा -Wrestlers Protest : विनेश शस्त्र उचलण्याबद्दल का बोलली? कोणाला म्हणाली आंधळा, मुका आणि बहिरा राजा?, जाणून घ्या

Last Updated : Jun 18, 2023, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details