महाराष्ट्र

maharashtra

प्रजासत्ताकदिनी दिसणार 'राफेल'ची ताकद; हवाई प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग

By

Published : Jan 18, 2021, 8:14 PM IST

येत्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये राफेल विमानाची ताकद पहायला मिळणार आहे. या परेडच्या फ्लाईपास्टच्या शेवटी राफेलच्या व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन उड्डाणाची प्रात्यक्षिके पहायला मिळणार आहेत. हवाई दलाच्या प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली...

Breaking News

नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये राफेल विमानाची ताकद पहायला मिळणार आहे. या परेडच्या फ्लाईपास्टच्या शेवटी राफेलच्या व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन उड्डाणाची प्रात्यक्षिके पहायला मिळणार आहेत. हवाई दलाच्या प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली. राफेल विमानांचा सहभाग हा देशाच्या हवाई दलाच्या स्क्वॉड्रन नंबर १७ गोल्डरन एरोमध्ये होतो.

काय आहेत राफेलची वैशिष्ट्ये?

  • दोन इंजिनांचे लढाऊ विमान : राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील २ एम८८-२ इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे ७५ केएन थ्रस्टचे आहे.
  • हवेतही एकमेकांना मदत करू शकतात : राफेल लढाऊ विमाने ही हवेत इंधन भरू शकतात. ही विमाने एकमेकांना इंधने भरण्यास मदतही करू शकतात.
  • दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी या विमानातून मेटिओर क्षेपणास्त्र नेले जाऊ शकते. मेटिओर हे क्षेपणास्त्र दृष्टिक्षेपापलिकडचे लक्ष्य हवेतून हवेत भेदू शकते. १०० किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते.
  • स्काल्प क्षेपणास्त्र हे जमिनीवरचे ३०० किलोमीटर दूर असलेले लक्ष्य भेदू शकते : राफेलमध्ये स्काल्प क्षेपणास्त्र ठेवता येईल. हे जमिनीवर लांब पल्ल्यावर हल्ला करू शकते. ३०० किलोमीटरच्या परिघात लक्ष्य भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
  • एका वेळी ६ आस्म क्षेपणास्त्रे वाहण्याची क्षमता : प्रत्येक आस्म क्षेपणास्त्राला जीपीएस आहे आणि इमेजिंग टरमिनल गायडन्स आहे. अगदी अचूकतेने १० मीटर्सपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.
  • विमानात होलोग्राफिक कॉकपिट आहे.
  • राफेल एका वेळी ८ लक्ष्य साध्य करू शकते.
  • राफेलमध्ये टिकण्याची क्षमता प्रचंड आहे.
  • या आधुनिक लढाऊ विमानात हॅमर क्षेपणास्त्र असेल. (हॅमर क्षेपणास्त्राच्या मागणीवर काम सुरू आहे आणि राफेलसाठी फ्रेंच अधिकाऱ्यांनी अगदी कमी कालावधीत हॅमर उपलब्ध करून देण्याबद्दल मान्य केले आहे.)

हेही वाचा :अटारी-वाघा सीमेवरील बीटिंग रिट्रिट समारोह रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details