महाराष्ट्र

maharashtra

ISI Threat Hindu Families : चार हिंदू कुटुंबांना जीवे मारण्याची आयएसआयची धमकी

By

Published : Jul 23, 2022, 11:24 AM IST

रामपूर जिल्ह्यात ४ हिंदू कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली ( ISI Threat Hindu Families ) आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर चारही कुटुंबात घबराटीचे वातावरण आहे. पत्र लिहिणारी व्यक्ती दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत आहे. तर पत्राच्या वर आयएसआय असे लिहिले आहे.

ISI Threat Hindu Families
ISI Threat Hindu Families

रामपूर : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात ४ हिंदू कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी ( ISI Threat Hindu Families ) देणारे पत्र मिळाली आहेत. घटनेची माहिती मिळताच या चारही कुटुंबांना पोलिस संरक्षण देण्यात आले. पत्राच्या वर आयएसआय असे लिहिले आहे. उर्दू, अरबी आणि इंग्रजी भाषेत धमकीची पत्रे लिहिली आहेत. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या कुटुंबांना संरक्षण दिले आहे.

आयएसआयची जीवे मारण्याची धमकी

रामपूरमधील शहााबाद तहसील येथील अन्वा गावातील रहिवासी कुलदीप ठाकूर यांच्या घराबाहेर पहाटे दरवाजाजवळ चार बंद लिफाफे आढळून आले. पाकिटांवर इंग्रजी आणि उर्दूमध्ये लिहिले होते. ही पत्रे कुलदीपला एका जाणकाराने वाचून दाखवली तेव्हा त्याचा थरकाप उडाला. पत्रांमध्ये कुलदीप, कुलदीपचा मामा भानू प्रताप सिंग, वीरपाल सिंग आणि गावातील रहिवासी गीता देवी या ब्राह्मण महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. हे धमकीचे पत्र मिळाल्यानंतर चारही कुटुंबात घबराटीचे वातावरण आहे. पत्र लिहिणारी व्यक्ती स्वत:ला दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत आहे.

पीडित कुलदीपसिंह यांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता तो घरी आला तेव्हा त्याच्या दरवाजाजवळ काही लिफाफे पडलेले होते. कुलदीपची आई घरातून बाहेर आली आणि म्हणाली की, कोणीतरी जादूटोणा आहे. त्याला स्पर्श करू नका. मात्र कुलदीपने ते लिफाफे उचलून परिसरातील लोकांना दाखविले. त्यातील एकाने, पाकिटावर कुलदीपचे नाव लिहिले आहे, असे सांगितले. त्यानंतर लिफाफा उघडला असता त्यात एक लाल कपडा दिसला. लाल कापडावर दोन पत्र चिकटवले होते. त्यावर इंग्रजी आणि उर्दूमध्ये लिहिले होते. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे लिहिले होते. ते ऐकून कुलदीपचा थरकाप उडाला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. कुलदीपने सांगितले की, त्याच्यासह एकूण ४ जणांना धमक्या आल्या आहेत.

चौघांना आली धमकी - कुलदीपप्रमाणे चार कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. दुसरे पीडित भानू प्रताप सिंह यांनी सांगितले की, माझे कोणाशीही वैर नाही. पत्र मिळाल्यानंतर मला खूप भीती वाटत आहे. मात्र, सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. त्यांचा आम्हाला आधार आहे.

हेही वाचाCobra Video : कोब्राने गिळले दोन मैना पक्षी; अन् गुंतले तोंडात, पुढे झाले असे काही... पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details