बरेली - जिल्ह्यात दोन वेगळ्या घटनांमध्ये धर्मांतर करून मुस्लीम महिलांनी हिंदू पुरुषांशी लग्न केले. या महिलांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पहिले प्रकरण बरेलीतील हाफिजगंज भागातील आहे, जिथे पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशन बोलावले आणि गुन्हा नोंद न करता याविषयाचा तोडगा काढला. बहेडी जिल्ह्यातील दुसर्या प्रकरणात महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या हिंदू पतीविरूद्ध अपहरण आणि दरोडेखोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल नाही
एसएसपी रोहितसिंग सजवान यांनी पत्रकारांना सांगितले, "हाफिजगंज व बहेडी भागातील जोडपे प्रौढ आहेत. दोन्ही प्रकरणात आम्ही मुलीचे म्हणणे ऐकले. हाफिजगंज प्रकरणात या जोडप्याने पोलीस स्टेशन गाठले आणि सुरक्षेची मागणी केली. आम्ही दोघांच्या कुटुंबीयांना हा खटला मिटविण्यासाठी बोलविले. मुलीच्या कुटुंबीयांनी हे लग्न स्वीकारले आहे आणि कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही." गुरुवारी रितोरा भागातील एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. या दाम्पत्याच्या समर्थनार्थ भगवा पक्षाचे सदस्यही पुढे आले.