महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parliament Employee New Uniform : संसद कर्मचाऱ्यांच्या नव्या पोषाखावरून नवा वाद, विरोधकांनी काय घेतला आहे आक्षेप?

Parliament Employee New Uniform : नव्या संसद भवनात सर्व काही नवं दिसेल. संसदेचे कर्मचारी, मार्शल आणि सुरक्षा कर्मचारी नव्या रुपात आणि नव्या शैलीत दिसणार आहेत. काय आहेत हे बदल, जाणून घेण्यासाठी वाचा 'ईटीव्ही भारत'च्या वरिष्ठ वार्ताहर अनामिका रत्ना यांचा अहवाल.

Parliament Employee New Uniform
Parliament Employee New Uniform

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 5:41 PM IST

नवी दिल्ली Parliament Employee New Uniform : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनादरम्यान, नव्या संसद इमारतीतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, नवीन संसद भवनात सर्व काही बदललेलं दिसेल. सरकारनं आता संसद कर्मचाऱ्यांच्या पेहरावात बदल केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या शर्टवर कमळाची फुलं : संसदेतील कर्मचाऱ्यांचा ड्रेस जुन्या ड्रेसपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. सचिवालयातील कर्मचाऱ्यांना बंद गळ्यातील सूटऐवजी मजेंटा रंगाचं नेहरू जॅकेट देण्यात आलंय. हाच पोशाख सभापतींसमोर बसून सभागृहाच्या कामकाजाची नोंद घेणारे कर्मचारीही परिधान करतील. यासह लोकसभा आणि राज्यसभेच्या मार्शलचा ड्रेसही बदलण्यात आलाय. त्यांचा शर्ट गडद गुलाबी रंगाचा असेल. त्यावर कमळाची फुलं असतील आणि ते खाकी रंगाची पॅन्ट घालतील. मात्र या कमळाच्या फुलावर विरोधी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

ड्रेसमध्ये बदल करण्यामागे सरकारचा अजेंडा : काँग्रेस नेते रशीद अल्वी यांचं म्हणणं आहे की, ड्रेसमध्ये बदल करण्यामागे सरकारचा अजेंडा आहे. 'जर बदल घडवायचा असेल तर कमळाची फुलंच का? सरकारला संपूर्ण देश भगव्या रंगात बदलायचा आहे का? असे सवाल अल्वी यांनी उपस्थित केले. राजद नेते मनोज झा यांनीही यावर आक्षेप घेतला. लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेत भगवेकरण आणि अजेंड्याचं राजकारण करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. सरकार सुरक्षा कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचा पोशाख त्यांच्या पक्षाच्या पोशाखाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज झा यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांचा पोशाख लष्करी शैलीत बदलण्यात आला : सूत्रांनुसार, संसदेच्या कर्मचाऱ्यांचा पोशाख लष्करी शैलीत बदलण्यात आला आहे. याशिवाय ते कमांडो प्रशिक्षणही घेत आहेत. तसेच त्यांना वागण्या-बोलण्याबाबतही प्रशिक्षण दिलं जात आहे. आता सफारीऐवजी हे सर्व कर्मचारी सूट आणि बूटमध्ये दिसतील. यासह कर्मचार्‍यांना नवीन संसदेची पूर्ण माहिती ठेवण्यास सांगितलं गेलं आहे. त्यांच्या वागण्यात गोडवा येण्याबरोबरच शिस्तीलाही स्थान देण्याचे संकेत दिले आहेत. नवीन संसद भवनात मार्शल मणिपुरी टोप्या घालताना दिसतील.

गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रवेश :नवीन संसद भवनात गणेश चतुर्थीच्या दिवशी (१९ सप्टेंबर) रीतसर पूजा करून प्रवेश केला जाईल. १८ सप्टेंबरला बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनातच कामकाज होणार आहे. या दिवशी जुन्या संसद भवनाच्या बांधकामापासून आतापर्यंतच्या आठवणींवर चर्चा केली जाईल. यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना वेळ दिला जाईल.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : संसदेचं विशेष अधिवेशन होणार नवीन संसद भवनात
  2. Remove INDIA Word : राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची तयारी, सरकार विशेष अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता
  3. Parliament Special Session 2023 : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पारित करा, आमदार कविता यांचं 47 राजकीय पक्षांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details