नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसचा दुप्पट वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे जे आकडे समोर आले आहेत, ते भयावह आहेत. देशात एकाच दिवसात 1 लाख 17 हजार 100 नवे कोरोना रुग्ण ( corona cases in india ) आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या ही 3,52,26,386 झाली आहे. तर ओमायक्रॉनच्या रुग्णमध्येही भारतात वाढ ( omicron cases increased in india ) होत आहे. आतापर्यंत देशभरात 3 हजार 7 नवे रुग्ण ( corona new variant omicron ) आढळले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतातील कोरोनाची आकडेवारी -
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण अनुक्रमे 876 आणि 465 आढळून आले आहे. ओमायक्रॉनच्या 3007 रुग्णांपैकी 1199 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड-19 च्या एक दिवसात 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाने 4,83,178 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाच्या उपचाराधिन असलेल्या रुग्णांची संख्या ( active cases of corona in india ) ही 3,71,363 झाली आहे.
बरे झालेले रुग्ण -