महाराष्ट्र

maharashtra

केरळ : सीपीएमचे 92 सदस्य भाजपमध्ये दाखल

By

Published : Feb 23, 2021, 10:14 PM IST

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि व्ही. मुरलीधरन यांच्या उपस्थितीत मंगळवारी सीपीएमचे जवळपास 92 सदस्य भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले.

CPM members join BJP
CPM members join BJP

तिरुअनंतपुरम- केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि व्ही. मुरलीधरन यांच्या उपस्थितीत मंगळवारी सीपीएमचे जवळपास 92 सदस्य भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्रिमंडळात मुरलीधरन हे केरळचे एकमेव सदस्य आहेत.

भाजपमध्ये सामील झालेल्यांमध्ये माजी अध्यक्ष आणि कोवलम पंचायतचे स्थानिक नेते एम. के. प्रभाकरन आणि पाच महिलांचा समावेश आहे. राज्य भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी जोशी यांनी राज्यातील राजधानीत उपस्थित असलेल्या या नवीन सदस्यांना सदस्यत्व देण्यात आले. हे सर्व जण कोवलम विधानसभा मतदारसंघातील पानाविला आणि नेल्लीकनू स्थानिक समित्यांचे सदस्य आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details