कर्नाल ( हरियाणा ) -कर्नाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नालमधून अटक करण्यात आलेले दहशतवादी देशाच्या विविध भागात शस्त्रास्त्रे पुरवायचे. ही गोष्ट गांभीर्याने घेत कर्नाल पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 8 पथके ( Karnal Police special team on terrorist ) तयार करण्यात आली आहेत. पोलिसांची ही पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली आहेत. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये छापे टाकून दहशतवाद्यांचा संपूर्ण प्लान उघड करण्यात येणार आहे.
हरियाणातील कर्नाल येथे गुरुवारीचार दहशतवाद्यांना अटककेल्याने ( Karnal Terrorist Arrest ) देशभरात खळबळ उडाली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, करनाल पोलिसांनी बस्तारा ( Khalistani militants near Bastara ) टोलजवळून चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. लुधियाना येथील भूपिंदर सिंग ( Bhupinder Singh ) आणि फिरोजपूर येथील गुरप्रीत सिंग, परमिंदर सिंग आणि अमनदीप सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पाकिस्तानमध्ये बसून हरविंदर सिंग रिंडा ( Harvinder Singh Rinda ) याच्या सांगण्यावरून देशातील विविध राज्यात शस्त्रास्त्रे पुरवत होते.
मोबाईल अॅपद्वारे लोकेशन पाठवित असे-हरविंदर सिंग रिंडा हा पाकिस्तानात बसून मोबाईल अॅपद्वारे भारतातील आपल्या गुंडांना लोकेशन पाठवत असे. त्याच ठिकाणी या लोकांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पुरवायची होती. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण तेलंगणातील आदिलाबाद येथील आहे. अटक करण्यात आलेले चार दहशतवादी आदिलाबाद येथे शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी जात होते. पाकिस्तानात बसलेला रिंडा ड्रोनच्या मदतीने पंजाबमधील फिरोजपूरच्या शेतात शस्त्रे आणि स्फोटके पाठवत असे.
स्फोटके, हत्यारे व रोख रक्कम जप्त-अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या झडतीदरम्यान इनोव्हा वाहनातून एक मॅगझिन, देशी बनावटीचे पिस्तूल, 31 जिवंत काडतुसे, 3 लोखंडी कंटेनर जप्त केले. यासोबतच एक लाख ३० हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. वाहनातील तरुणांकडून सहा मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.