लंडन : शनिवारी भारत आणि इंग्लंड संघात तीन एकदिवसीय सामन्यातील शेवटचा सामना पार ( INDW vs ENGW 3rd ODI ) पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 16 धावांनी पराभव ( India beat England by 16 runs ) केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकत इंग्लंडला क्लीन स्वीप दिला. या सामन्यानंतर बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली ( Captain Harmanpreet Kaur statement ), शेवटचा रन आऊट नियमानुसार होता.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाचा डाव 45.4 षटकांत 169 धावांत आटोपला. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ( Jhulan goswami farewell match ) होता. 170 धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना इंग्लंडची सुरुवात संथ झाली. संघाला पहिला धक्का 8व्या षटकात बसला. एम्मा लॅम्ब 21 धावा करून बाद झाली. याशिवाय एमी जोन्सने 28 आणि शार्लोट डीनने 47 धावा केल्या. टीम इंडियाकडून रेणुका सिंगने 4 विकेट घेतल्या. झुलनने 10 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. तसेत इंग्लंडचा संघ 43.4 षटकात 153 धावांवर सर्वबाद झाला.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ), जिला इंग्लंडविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप करताना प्रथमच मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. तिने सांगितले की, दीप्ती शर्माने शार्लोट डीनला धावबाद करणे नियमानुसार होते.