महाराष्ट्र

maharashtra

13 August Rashi Bhavishya या राशीवाल्यांची आज संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल जाणून घ्या आजचे राशीभविष्य

By

Published : Aug 13, 2022, 12:04 AM IST

Updated : Aug 13, 2022, 11:55 AM IST

कसा असेल तुमचा दिवस अभ्यास प्रेम लग्न व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का मुलांना अभ्यास करावा वाटत नाही काय करावे येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतवर वाचा आजचे राशीभविष्य

13 August Rashi Bhavishya
13 August Rashi Bhavishya

मेष चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील.

वृषभचंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख शांती मिळेल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडी वाटेल. सरकार कडून लाभ मिळतील.

मिथुन चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद करू नका. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहा.

कर्क चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या - पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करणे हितावह राहील.

सिंहचंद्र कुंभ राशीस स्थित आहे आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे परिणामतः प्रापंचिक गोष्टी पासून मन अलिप्त होईल सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आनंद देणारा नसेल

कन्याचंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारून त्यात यशस्वी व्हाल.

तूळचंद्र कुंभ राशीस स्थित आहे आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद - विवाद व चर्चेत पडू नका. आरोग्याच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास सुखदायक ठरेल.

वृश्चिकचंद्र कुंभ राशीस स्थित आहे आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्या विषयी जपून राहावे. स्त्रीवर्ग व पाण्या पासून नुकसानीची शक्यता आहे.

धनूचंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान - सन्मान संभवतात.

मकर चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.

कुंभ चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आज आपणाला गूढ शक्तीचा प्रभाव जाणवेल. नकारात्मक विचार दूर ठेवल्याने लाभ होईल.

मीन चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. वाणीतील असंयम भांडणे निर्माण करील. झटपट लाभ मिळविण्याची लालसा महागात पडेल.

Last Updated : Aug 13, 2022, 11:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details