महाराष्ट्र

maharashtra

अहमदाबादमध्ये स्थलांतरित कामगारांकडून पोलिसांवर दगडफेक, दीडशे जण ताब्यात

By

Published : May 18, 2020, 4:03 PM IST

Updated : May 18, 2020, 8:06 PM IST

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांना गावी परतायचे आहे. याच मागणीसाठी ते सर्व एकत्र जमले होते. यावेळी त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या कामगारांनी दगडफेक केली. ज्यानंतर वस्त्रापूर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

Clashes between Migrant  workers and police
अहमदाबादमध्ये स्थलांतरित कामगारांकडून पोलिसांवर दगडफेक

अहमदाबाद- गुजरातमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार वस्त्रापूर येथील रस्त्यावर एकत्र आले. यावेळी त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या कामगारांनी दगडफेक केली. ज्यानंतर वस्त्रापूर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांना गावी परतायचे आहे. याच मागणीसाठी ते सर्व एकत्र जमले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलीस दलासोबत काही अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या पोलिसांनी यातील दीडशेहून अधिक कामगारांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत पोलीस दलातील दोन ते तीन जवान जखमी झाले आहेत.

अहमदाबाद 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी आनंद मोदी माहिती देताना...

तर, दुसऱ्या घटनेत राजकोटमधील स्थलांतरित कामगारांनी शापर औद्योगिक वसाहतीत वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 29 जणांना ताब्यात घेतले आहे.

Last Updated : May 18, 2020, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details