महाराष्ट्र

maharashtra

'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा' नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

By

Published : Jan 23, 2021, 12:03 PM IST

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हिरो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा' हा त्यांचा नारा देशवासियांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देऊन गेला. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापन करून शसस्त्र दल उभे केले.

सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस

नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हिरो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा' हा त्यांचा नारा देशवासियांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देऊन गेला. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापन करून इंग्रजांविरोधात शसस्त्र लढा दिला. या वर्षीपासून नेताजींची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून साजरी केली जात आहे. या दिवसाला नेताजींच्या धाडसी पराक्रमाची ओळख देण्यात आली आहे.

नेताजींचा जीवनप्रवास -

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांतातील कटक शहरात झाला होता. बोस यांच्या वडीलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. त्यांचे वडील जानकीनाथ कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. ते एकूण १४ भावंडे होते. यात ६ मुली आणि आठ मुले होते. नेताजी कुटुंबातील ९ वे अपत्य होते.
  • नेतांजींचे प्राथमिक शिक्षण कटक शहरातून झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण स्कॉटिश चर्च कॉजेलातून झाले. त्यानंतर नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी नेताजी इंग्लडला केंब्रिज विद्यालयात गेले.
  • १९२० साली त्यांनी नागरी सेवा परीक्षा पास केली. मात्र, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेण्यासाठी सरकारी नोकरी सोडून दिली. काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी राजकीय लढ्याला सुरूवात केली. पंजाबातील जालीयनवाला बाग हत्याकांडाने बोस अंत्यत विचलित झाले.
  • काँग्रेसमध्ये महात्मा गांधी मवाळ गटाचे नेतृत्व करत होते तर सुभाषचंद्र बोस जहाल गटाचे नेते होते. त्यामुळे दोघे एकमेकांचे वैचारिक विरोधक होते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळावे, हे एकच ध्येय होते. नेताजी आणि गांधींचे स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग वेगळे होते. इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी सशस्त्र क्रांतीची गरज आहे. मात्र, महात्मा गांधी अहिंसेवर विश्वास ठेवणारे होते.
  • १९३८ साली नेताजींची राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना केली. १९३९ साली नेताजी सुभाष चंद्र बोस पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहीले. गांधीजींचे समर्थन असलेले नेते पट्टाभी सितारामय्या यांची त्यांनी पराभव केला. मात्र, यामुळे गांधी आणि नेताजी यांच्यात वाद वाढला. त्यामुळे नेताजींनी काँग्रेस पक्ष सोडला.
  • भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ ला आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्याअंतर्गत त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. ४ जुलै १९४४ ला नेताजी सैन्याबरोबर बर्मा म्हणजेच आताचे म्यानमारला पोहचले. येथे त्यांनी 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा' हा नारा दिला.
    आझाद हिंद सेनेची फौज
  • १९२१ ते १९४१ सालादरम्यान ते अनेक वेळा तुरुंगात गेले. अहिंसेद्वारे स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असा त्यांचा विचार होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी रशिया, नाझी जर्मनी, जापाना या देशांचे दौरे करत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला मदत मिळवण्याचा प्रयत्न केला.
  • नेताजींनी आझाद हिंद रेडिओ स्टेशनची सुरुवात जर्मनीतून केली. पूर्व आशियातील भारतीय राष्ट्रीय आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. भगवत गीता माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत असल्याचे सुभाष बाबू म्हणत.
  • १८ ऑगस्ट १९४५ रोजी तईपेई येथे एका विमान दुर्घटनेत नेताजी सापडले. या अपघातानंतर नेताजी बेपत्ता झाले. या अपघाच्या चौकशीसाठी अनेक आयोग आणि समित्या स्थापन करण्यात आल्या. अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचा दावा तपास आयोगाने केला. मात्र, यावर अनेक वादंग उठले. नेताजी जिवंत असल्याच्याही बातम्या पसरू लागल्या. मात्र, या प्रकणाचे गुढ कायम राहिले. २०१६ साली केंद्र सरकारने नेतांजीबाबतचे गुप्त दस्तावेज सार्वजनिक केले.

पराक्रम दिन - तरुणांना नेताजींच्या कार्यातून प्रेरणा मिळेल

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निस्वार्थीपणे देशाची सेवा केली. त्यांचा हा सन्मान आहे. नेताजींची जयंती दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून देशवासियांना मुख्यता तरुणांना प्रेरणा मिळेल. असंख्य अडचणी समोर असतानाही नेताजींनी लढा दिला. तरुणांमध्ये राष्ट्रवाद जागविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे.

१२५ व्या जयंतीनिमित्त घेतला निर्णय -

देशाप्रती नेताजींनी जी सेवा दिली, त्याची प्रत्येक भारतीय आठवण काढतो. त्यांच्या १२५ व्या जंयती निमित्त सर्वजण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ. २०२१ पासून २३ जानेवारी हा दिवस दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details