ETV Bharat / spiritual

'या' राशींना लाभदायक काळ, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 6:23 PM IST

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य (Maharashtra Desk)

  • मेष : या आठवड्याच्या अखेरपर्यंत आपणास आपली कारकीर्द, व्यवसाय, परीक्षा, स्पर्धा इत्यादींशी संबंधित चांगली बातमी मिळेल. आपण जर अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात आपली हि इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या सुरूवातीस धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. महिलांचा जास्तीत जास्त वेळ पूजा - पाठ इत्यादी करण्यात जाईल. भावंडाना भेटण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात थकवा, आळस आणि ऋतुजन्य आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात आपण जर मिळालेल्या संधीचा लाभ घेतला नाहीत तर अनेक दिवस आपणास पुन्हा संधी मिळण्याची वाट पाहावी लागेल. कार्यक्षेत्री वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. कनिष्ठ आपणास पूर्ण सहकार्य करतील. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्त होईल. राजकारणी व्यक्तींना मोठे पद, प्रशंसा आणि सन्मान मिळण्याची संभावना आहे. प्रेम संबंध दृढ झाल्यानं आपसातील विश्वास वृद्धिंगत होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. मुलांकडून सुखद बातमी मिळू शकते.
  • वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपल्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. त्याच्या प्रभावामुळं आपले कार्य आणि व्यापार आपण जोश पूर्वक कराल. त्यामुळं आपण आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट आपणास सुखावून जाईल, परंतु आठवड्याच्या उत्तरार्धात वैवाहिक जीवनाशी संबंधित एखादी समस्या आपणास त्रस्त करण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांची बदली ना आवडत्या ठिकाणी झाल्यानं तणावास कारणीभूत होऊ शकते. या आठवड्यात आपणास सावध रहावे लागेल. वाणी आणि व्यवहारात संयमित राहण्याची गरज आहे. अचानकपणे येणाऱ्या गुप्त शत्रूंपासून सावध राहा. प्रणयी जीवनात विचारपूर्वक पाऊल उचलावे. नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी आपल्या प्रेमिकेच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्रेमळ भांडणं होऊन सुद्धा दांपत्य जीवन सुखद होईल.
  • मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास आपल्या कार्यक्षेत्रात बेफिकीर राहून चालणार नाही. त्याचबरोबर आपले विरोधक कि जे आपल्याशी नेहमी स्पर्धात्मक व्यवहार करत असतात त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. ते आपल्या योजनांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्याची संभावना असून आपल्यासाठी ते कष्टप्रद होऊ शकते. आठवड्याच्या मध्यास एखादी घरगुती समस्या महिलांसाठी तणावाचं कारण होऊ शकते. त्याचं निराकरण करण्यासाठी एखाद्या बाहेरील व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. हि बाहेरील व्यक्ती आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावेल. या दरम्यान वाणी संयमित ठेवावी. अनावश्यक वाद टाळावेत. लहान-सहान गोष्टींना आपल्या मनात थारा देऊ नये. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापारी वर्गाचे आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं काम सामान्यपणे चालेल आणि त्यामुळं त्यांचे मन प्रसन्न होईल. या दरम्यान व्यापारी वर्गात नवीन उत्साह निर्माण होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. कदाचित बाजारातील थकबाकी सुद्धा मिळेल. कामानिमित्त केलं प्रवास लाभदायी होतील. प्रणयी जीवन सामान्यच राहील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं मन काहीसे चिंतीत होईल.
  • कर्क : या आठवड्यात आपणास स्वतःहून आपली कामे करावी लागतील. इतरांवर अवलंबून राहिल्यास स्वतःच्या आत्मविश्वासाच्या अभावाचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या पूर्वार्धात सहकाऱ्यांची किंवा प्रिय व्यक्तीची मदत न मिळाल्यानं मन खिन्न होईल. असं असलं तरी आठवड्याच्या मध्यास आपल्या समस्यांचे निराकरण होत असल्याचं दिसू लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपले वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावयास हवा. आठवड्याच्या पूर्वार्धा पेक्षा उत्तरार्ध शुभ फलदायी असल्याचं दिसते. या दरम्यान आपला उत्साह आणि पराक्रम पराकोटीस गेलेला असेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यात सन्मान प्राप्ती संभवते. कोर्ट-कचेरीशी संबंधितबाबीत आपण यशस्वी व्हाल. प्रेम संबंधदृढ होऊन एकमेकातील विश्वास वाढेल. कदाचित आपल्या प्रेम संबंधास कुटुंबाची मान्यता मिळून विवाह ठरू शकतो. वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकून राहील. कुटुंबीय आणि मित्रांच्या सहवासात आनंदाचं क्षण घालविण्याची संधी मिळेल.
  • सिंह : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. हा आठवडा शुभदायी आणि सौभाग्यप्रद फले एकाच वेळी प्रदान करणारा आहे. असं असलं तरी चुकून सुद्धा उत्साहित होऊन आपली शुद्ध हरवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा आपली होऊ घातलेली कामे बिघडू शकतात. कुटुंबीय आणि प्रियजनांच्या सहवासात हास्य-विनोद करताना सुद्धा मर्यादेचे पालन करावं. आपली वाणी आपलं चारित्र्य दर्शविते याची जाणीव ठेवून कोणाचाही अपमान करू नये, अन्यथा चांगल्या संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना सुरूवातीपासूनच प्रत्येक विषयाचा अभ्यास लक्षपूर्वक केल्यास उत्तम यश प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून त्रासदायी ठरलेल्या समस्येचे निराकरण होईल आणि त्यामुळं आपण सुखावून जाल. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. आपण या आठवड्यात जर एखाद्या व्यक्तीस विवाहाची मागणी घातली तर ती समोरच्या व्यक्तीस मान्य होईल.
  • कन्या : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धातच आपल्यावर अतिरिक्त कामाचा भार येऊ शकतो. त्याचबरोबर आपणास कौटुंबिक समस्या सुद्धा त्रस्त करू शकतील. अशा परिस्थितीत कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई न करता आपल्या शुभचिंतकांचे मार्गदर्शन घेतल्यास एखादे निश्चित उद्धिष्ट प्राप्त करू शकाल. कोणत्याही आव्हानांचा सामना करताना हे लक्षात ठेवावं की जसं दिवस चांगले नाहीत तसेच हे वाईट दिवस सुद्धा जास्त काळ टिकणारे नाहीत. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या जीवनात आलेल्या अडचणी आपला प्रभाव कमी करत असल्याचं आपणास जाणवेल. प्रणयी जीवनात विचार पूर्वक पाऊले उचलावी लागतील, अन्यथा सामाजिक कलंक लागण्याची शक्यता आहे. कठीण काळात आपला वैवाहिक जोडीदार आपल्याबरोबर सावली प्रमाणे उभा राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
  • तूळ : या आठवड्याचा पूर्वार्ध अत्यंत लाभदायी आहे. आपणास नशिबाची साथ मिळत असल्याचं दिसून येईल. त्यामुळं आपला उत्साह आणि आत्मविश्वास उंचावेल. असं झाल्यानं आपण आपली सर्व कामे योग्य प्रक्रारे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींसाठी हा आठवडा सन्मान आणि पद उंचावणारा होऊ शकतो. त्यामुळं त्यांच्यावर काही जवाबदारी टाकण्यात येऊ शकते. आठवड्याच्या मध्यास एखादी कुटुंबिक समस्या आपल्या चिंतेस कारणीभूत होऊ शकते. परंतु आपण आपल्या विवेकबुद्धीने त्याचे निराकरण करण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आपणास अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मोठी उपलब्धी प्राप्त होऊ शकते. त्यांची आवडत्या ठिकाणी बदली किंवा पदोन्नती होण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदारासह एखादी तीर्थ यात्रा संभवते. प्रकृती सामान्यच राहील असे दिसते.
  • वृश्चिक : हा आठवडा आपली कामे पूर्ण करणारा असला तरी आपल्या चुकीमुळं कामात बिघाड होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळं आपणास आपली वाणी आणि व्यवहार यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपणच आपले काम करू शकता किंवा बिघडवू शकता याची जाणीव ठेवावी. अशा वेळी कोणताही निर्णय विचार पूर्वकच घ्यावा. कार्यक्षेत्री आपणास जे काही नवीन करावयाचं आहे त्याची वाच्यता करू नये अन्यथा आपले विरोधक त्यात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. आपणास जर भागीदारीत एखादा व्यवसाय करावयाचा असेल तर आर्थिक गुंतवणूक, कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी आधी पूर्ण करूनच पुढे व्हा. कोर्ट-कचेरीशीसंबंधी बाबीत कोर्टाबाहेर समाधान होत असेल तर त्याचा जरूर स्वीकार करा. अन्यथा त्याचं निराकरण होण्यासाठी आपणास खूप दिवस वाट पाहावी लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आपली प्रकृती आणि सामान याकडं विशेष लक्ष द्यावं. प्रेम संबंध मधुर आणि दृढ करण्यासाठी आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या भावना आणि गरजा याकडं दुर्लक्ष करू नये. कठीण प्रसंगी आपण आपल्या जोडीदारास आपल्या बरोबर असलेला बघाल.
  • धनु : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आणि सौभाग्यवर्धक सुद्धा आहे. ज्या कामांची योजना आपण अनेक दिवसांपासून करत होता ती कामे वेळेवर पूर्ण झाल्यानं आपण प्रसन्न व्हाल. नोकरी आणि व्यापार अशा दोन्ही ठिकाणी चांगल्या बातम्या मिळतील. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून जास्त आर्थिक फायदा होण्याची संभावना आहे. त्याचबरोबर हा आठवडा नव्यानं आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा लाभदायी आहे. असं असलं तरी कोणत्याही नवीन योजनेत पैसा गुंतविण्यापूर्वी आपल्या शुभचिंतकांचा आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेण्यास विसरू नये. आपल्याकडं जो काही पैसा आला आहे त्याचा अहंकार इतरांसमोर प्रदर्शित करू नका. सर्वांचा योग्य मान राखावा. राजकारणात असलेल्या व्यक्तींना मोठे पद किंवा जवाबदारी देण्यात येऊ शकते. स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आपण जर एखाद्या व्यक्तीस विवाहाची मागणी घातली तर त्यात आपण यशस्वी व्हाल. दांपत्य जीवन सुखद होईल. पूर्वी पासून चालत असलेल्या प्रेम संबंधात सुद्धा माधुर्य आणि विश्वास वृद्धिंगत होऊ लागेल.
  • मकर : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. या आठवड्यात कोणतेही कार्य घाई घाईत न करण्याची खबरदारी घ्यावी. विशेषतः व्यापाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी. कारकिर्दीशी संबंधित कोणतेही कार्य भावनेच्या भरात आणि घाई घाईत करू नये, अन्यथा होऊ घातलेली कामे बिघडण्याची संभावना आहे. आठवड्याच्या सुरूवातीस धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल. नोकरी करणाऱ्यांची बदली संभवते. आपल्या मनाप्रमाणे जर आपल्या जीवनात गोष्टी होत नसतील तर आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. असं न केल्यास आपल्याकडं जे काही आहे ते सुद्धा गमावून बसाल. कार्यक्षेत्री वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्याशी जुळवून घ्यावं. अनावश्यक वाद टाळा. या आठवड्यात व्यापाऱ्यांनी व्यापार वृद्धी करताना इतरांवर गरजे पेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. प्रेम संबंधात विचार पूर्वक पाऊल उचलावे. तसेच आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणं टाळावं. वैवाहिक जोडीदाराच्या भावनांकडं दुर्लक्ष करू नका, त्यांच्यासाठी थोडा वेळ जरूर काढा.
  • कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. मात्र, स्वतःला भौतिक साधनांनी सुसज्ज करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित वस्तूंच्या खरेदीत जास्तीचा पैसा खर्च होऊ शकतो. आठवड्याच्या पूर्वार्धातच कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. हे प्रवास सुखद आणि लाभदायी होतील. या दरम्यान आपणास वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास कार्यक्षेत्री तसेच जवळच्या नात्यात कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान आपला आत्मसन्मान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. कौटुंबिक समस्यांचे निराकरण करताना कुटुंबियांच्या भावना आणि वरिष्ठांचे सल्ले दुर्लक्षित करू नये. एखाद्या महत्वाच्या निर्णयासाठी सल्ला घ्यावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात घाई करू नये. मनाप्रमाणे गोष्टी न घडल्यानं मन खिन्न होऊ शकते. या आठवड्यात प्रेमिकेशी सुद्धा काही कारणाने दुरावा येईल असे दिसते. हा दुरावा दूर करण्यात एखाद्या स्त्री मित्राची भूमिका महत्वाची होऊ शकते. वैवाहिक जोडीदारासह केलेली तीर्थ यात्रा, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करत असल्याचं दिसेल.
  • मीन : हा आठवडा आपणास चांगली बातमी देणारा आहे, ज्यात शुभता आणि सौभाग्य वृद्धिंगत होईल. आठवड्याच्या पूर्वार्धातच आपणास नशिबाची साथ मिळत असल्याचं जाणवेल. परिणामतः वरिष्ठांशी आपले सामंजस्य स्थापित होईल आणि आपल्या मनाप्रमाणे आपण बदली किंवा पदोन्नती प्राप्त करू शकाल. एखादा महत्वाचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळं आपली उपयुक्तता आणि समर्थन प्रशंसित केली जाईल आणि त्यामुळं आपल्या सन्मानात वाढ होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांना सुद्धा लाभदायी आहे. मित्र आणि शुभचिंतकांच्या मदतीनं व्यवसाय वृद्धी करण्याची संधी प्राप्त होईल. कौटुंबिक बाबीत सुद्धा चांगली बातमी प्राप्त होईल. घरात मंगल कार्याचं आयोजन होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्यानं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रणयीसंबंध दृढ होतील. दांपत्य जीवन सुखद होईल. गोडवा आणि विश्वासाचे बंधन वाढतच जाईल. प्रकृतीच्या दृष्टीनं आठवडा सामान्यच आहे.

हेही वाचा -

  1. अक्षय्य तृतीयेला करा 'या' गोष्टींचं दान, होईल विशेष फलप्राप्ती! - Akshaya Tritiya 2024
  2. 'अक्षय्य तृतीया'च्या मुहूर्तावर का खरेदी करतात सोनं? वाचा सविस्तर इतिहास - Akshaya Tritiya 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.