ETV Bharat / politics

"राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला...'; संजय राऊतांची टीका - Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 10:05 PM IST

Sanjay Raut On Raj Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) जोरदार टीका केली. आज बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील, असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Raj Thackeray
संजय राऊत (MH Desk)

प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Nashik Reporter)

नाशिक Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केलीय. खासदार संजय राऊत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

देशात संविधान वाचवण्याची लढाई : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशि‍दीतून फतवे काढले जातात, असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला होता. तसेच महायुतीच्या लोकांना हिंदूंनी मतदान करावं, असं आवाहनही केलं होतं. त्यावरून आता संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतलाय. काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही. महाराष्ट्रात आणि देशात सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रद्रोही असलेले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. जर राज ठाकरे अशी भूमिका घेत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला.

केजरीवाल मुंबईच्या सभेत सहभागी होतील : 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना सर्वोच्च न्यायलयाने ईडी आणि सरकारला फटकारलं. केजरीवाल यांची अटक ही राजकीय हेतूनं होती. केजरीवालांना अंतरिम जामीन मिळाल्यामुळं ते आता प्रचारात सहभागी होतील. अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा आम्हाला आनंद आहे. उद्धव ठाकरे आणि माझेही त्यांच्याशी बोलणं झालं. 17 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सांगता सभा आहे. त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केलं आहे. त्यांनी आमंत्रण स्विकारलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

हेमंत गोडसे तिसऱ्या क्रमांकावर जातील : विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला. नाशिककर गद्दारांना थारा देत नाही हा इतिहास आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला दोनदा खासदार केलं, प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे किमान तीन ते चार लाखांच्या फरकाने निवडून येतील आणि हेमंत गोडसे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात फटाक्यामुळं भाजली आज्जी; दोनशे रुपये बेतले जीवावर - Lok Sabha Election 2024
  2. ...तर दहा मिनिटं नवनीत राणा एकटी नाचेल; इम्तियाज जलील यांची जहरी टीका - lok sabha election
  3. "भाजपाला आता राज ठाकरेंची गरज भासली, इतके दिवस...."; रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Ravindra Dhangekar On Raj Thackeray
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.