ETV Bharat / politics

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनामुळं महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांमध्ये उत्साह; मुंबईत होणार सभा - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 5:16 PM IST

Lok Sabha Election 2024 : देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण तापलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचाराला वेग देण्यात आलाय. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलाय. आता ते दिल्ली, हरियाणा, पंजाब या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचारात सक्रिय होणार आहेत.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल (Maharashtra Desk)

प्रतिक्रिया देताना धनंजय शिंदे (Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालाय. अशा परिस्थितीमध्ये पुढील ३ टप्प्यात (चौथ्या टप्प्याचा प्रचार संपला आहे) अरविंद केजरीवाल हे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

प्रचारात होणार सक्रिय : आम आदमी पार्टी त्याचप्रमाणं इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते दिसणार आहेत. विशेष करून दिल्ली, हरियाणा, पंजाब या ठिकाणी ते प्रचारात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून देशात इतरत्रही हे प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंबईत अरविंद केजरीवाल यांची सभा घेण्याचे प्रयत्न इंडिया आघाडीकडून केले जात आहेत.

मुंबईतील सभेनं होणार फायदा : आम आदमी पक्षासाठी महत्त्वाची असणारी दिल्लीतील ७ जागांची निवडणुका ही, २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात तसेच पंजाब आणि चंदगड येथील १४ जागांची निवडणुकी ही १ जून रोजी सातव्या टप्प्यात होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात, मुंबईत १३ जागांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत प्रचाराला यावं अशी आग्रही भूमिका महाविकास आघाडी त्याचबरोबर राज्यातील, मुंबईतील आम आदमी पक्षाची आहे. त्या पद्धतीचं नियोजन सुद्धा केलं जात असून जर अरविंद केजरीवाल यांनी मुंबईमध्ये सभा घेतली तर त्याचा मोठा फायदा इंडिया आघाडीतील उमेदवारांना होणार असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी अधिक मजबूत होण्यास मदत होईल असंही धनंजय यांनी सांगितलंय.



कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह : महाराष्ट्रात निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक असताना, अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर होणं ही महाराष्ट्रातील, मुंबईतील आप कार्यकर्त्यांसाठी मोठी जमेची बाजू आहे. २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा होत असून महाराष्ट्रातील १३ जागांचा यात समावेश असून त्यामध्ये मुंबईच्या ६ जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला असताना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपचे कार्यकर्ते यापूर्वीच जोमाने कामाला लागले आहेत. परंतु आता खुद्द अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये फार मोठा उत्साह संचारला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब या पाठोपाठ महाराष्ट्र मुंबईमध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा बोलबाला आहे. ज्या पद्धतीनं देशात सध्या राजकीय वातावरण दूषित झालं आहे, अशा परिस्थितीमध्ये ५१ दिवस जेलमध्ये राहून आलेले अरविंद केजरीवाल आता निवडणुक प्रचारात भाजपाचे वाभाडे काढतील यात दुमत नाही.


द्वेषापोटी केजरीवाल इतके दिवस जेलमध्ये : अरविंद केजरीवाल यांची अटक आणि जामीन याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक जयंती माईणकर म्हणाले आहेत की, ज्या कारणावरून एका राज्याच्या ते सुद्धा दिल्ली सारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकणं ही भाजपाची फार मोठी चुकी होती. राजकीय व्देषापोटी त्यांना इतके दिवस जेलमध्ये ठेवाव लागलं. परंतु आत्ता देशात निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेल्या असताना अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाकडून त्यांच्या जामीन मंजूर होणं आणि अरविंद केजरीवाल पुन्हा प्रचारात सामील होणं ही इंडिया आघाडीसाठी त्याचबरोबर आम आदमी पक्षासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. पंजाब, दिल्ली या ठिकाणी आपचा फार मोठा प्रभाव आहे. परंतु मुंबईत जरी आपचा प्रभाव नसला तरीसुद्धा आपचे कार्यकर्ते मोठ्या पद्धतीने मुंबईत महाविकास आघाडी सरकारच्या प्रचारात सहभागी आहेत. याच कारणास्तव जर मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अरविंद केजरीवालांची एक जरी सभा झाली तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट पडणार असून महायुतीच्या अनेक उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो.


दिल्ली, पंजाब आम आदमी पक्षासाठी महत्त्वाचे : अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर बोलताना आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते धनंजय शिंदे म्हणाले आहेत की, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा जामीन दिला आहे. हा जामीन दिल्यामुळं फक्त आप आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नाही तर इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तसेच देशातील जनतेच्या मनामध्ये आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे.

प्रचारात अरविंद केजरीवाल सक्रिय : देशात निवडणुकीचे ३ टप्पे पार झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे सहाव्या आणि सातव्या टप्प्यांमध्ये अनुक्रमे दिल्ली आणि पंजाब येथे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवाल सक्रिय होणार असून मागील दहा वर्षात मोदी हुकुमशाही सरकारनं जनतेच्या विरोधात जे काही निर्णय घेतले आहेत, जी काही खोट्या खोट्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल केलीय. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. शेतकरी, मजूर, आदिवासी, तरुण, महिला या सर्वच घटकातील लोकांचं सरकारनं त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. हे अधिक प्रभावीपणे सांगण्याचं काम अरविंद केजरीवल आपल्या प्रचारामध्ये करतील.

यांच्या पायाखालची वाळू सरकली : देशात निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. अशामध्ये या तीन टप्प्यांमध्ये जो काही जनतेचा रिस्पॉन्स दिसून आलेला आहे किंवा इंडिया आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या सभांना जी काही गर्दी दिसू लागली आहे. त्याने भाजपा नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडवणीस यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ४ जून नंतर एनडीएसोबत यावं अशा पद्धतीची साद घालण्याचा प्रयत्न केलाय. सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक पूर्णपणे जनतेने आपल्या हाताशी घेतल्यामुळं या पुढील चार टप्प्याची निवडणूक ही भारतातील जनता आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये होणार आहे. म्हणूनच मोदी यांच्या तोंडून अशा पद्धतीची वाक्य बाहेर येत असल्याचं धनंजय यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. अरविंद केजरीवालांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका; म्हणाले 'भाजपाला लोकशाही संपवायची' - Arvind KeJriwal Press Conference
  2. संभाजीनगरात 'मशाल' अन् 'धनुष्यबाणात' तुफान राडा ; दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Lok Sabha Election 2024
  3. मणिपूरमधील 'शबरीं'चा अपमान झाला, तेव्हा पंतप्रधान चूप का, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.