ETV Bharat / entertainment

क्रिती सेनॉननं भावी जोडीदारीबद्दल केला खुलासा - KRITI SANON

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 5:39 PM IST

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॉननं तिच्या भावी जोडीदारीबद्दल खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.

Kriti Sanon
क्रिती सेनॉन ((kriti sanon - instagram))

मुंबई - Kriti Sanon : या वर्षाच्या सुरुवातीपासूनच क्रिती सेनॉन तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आता ती 'क्रू' चित्रपटात तब्बू आणि करिना कपूर खानबरोबर दिसली होती. ती कबीर बहियाला डेट करत असल्याच्या सध्या चर्चा आहेत. मात्र ती कोणाला डेट करत आहे, याबाबत तिनं अद्यापही खुलासा केलेला नाही. दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिनं भावी आदर्श जोडीदार कसा हवा याबद्दल खुलासा केला आहे. एका दिलेल्या मुलाखतीत क्रिती सेनॉनला विचारण्यात आलं की, ती कशाप्रकारच्या आदर्श जोडीदाराची अपेक्षा करेल.

क्रिती सेनॉन वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा : यावर क्रिती हसली आणि म्हटलं, 'मला माहित नाही. मला हवं तसं माझ्यासारखं कुणी आहे की नाही कुणास ठाऊक? मला असं वाटते की , आपण अपेक्षा करतो की मला सुंदर मुलगा पाहिजे. आपण नेहमीच स्वतःवर खूप दबाव टाकतो. मला वाटते जे योग्य आहे ते सापडेल. यानंतर तिनं तिच्या तिला कसा जोडीदार हवा याबद्दल सांगत म्हटलं, "जो मला हसवू शकतो, ज्याच्याशी माझे चांगले नाते असले. माझ्याशी तासनतास बोलू शकतो आणि माझ्या कामाचा आदर करेल आणि मला वाटते की ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. नात्यात प्रामाणिकपणा असायला हवा. त्या व्यक्तीची विनोदबुद्धी चांगली असली पाहिजे आणि हो त्यानं माझी काळजी घेतली पाहिजे. नेहमी प्रेमासाठी वेळ काढला पाहिजे. प्रेम सुंदर आहे ते प्रेम गुंतागुंतीचे नको."

क्रिती सेनॉनचा कथित बॉयफ्रेंड : कबीर बहियाबरोबर क्रितीत नात्यात असल्याचा अफवा आहेत. या दोघांनी लंडनमध्ये एकत्र होळी साजरी केली होती. मायक्रोब्लॉगिंग साइट रेडिटवर त्यांचे फोटो समोर आले होते आणि त्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की, क्रिती आणि कबीर डेटिंग करत आहेत. कबीर हा लंडनच्या एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. मात्र, क्रिती आणि कबीरनं त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. दरम्यान क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं ' हाऊसफुल्ल ५'मध्ये अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. याशिवाय ती 'दो पत्ती'मध्ये काजोलबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. याआधी या दोघींनी 'दिलवाले' चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्राचे फॅमिली व्हेकेशनमधील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल, पाहा पोस्ट - Priyanka Chopra
  2. जान्हवी आणि राजकुमार रावच्या 'मिस्टर अँड मिसेस माही'ची रिलीज तारीख ठरली, ट्रेलरचे काऊंट डाऊन सुरू - Mr and Mrs Mahi
  3. गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.