मुंढे साहेब तुम्ही आहे म्हणून तरुण वाचतील, वारकऱ्याकडून गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घेऊन जनजागृती - TUKARAM MUNDHE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घेऊन जनजागृती करणारा वारकरी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 10, 2026 at 8:48 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नाव चर्चेत आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात छापे टाकून भेसळखोर आणि इतर व्यसनी पदार्थांवर कडक कारवाई केली जात आहे. असं असताना सध्या पालखी सोहळा सुरू असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आज पुण्यात मुक्काम आहे. पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या मुक्कामाला असताना आज सकाळपासून मोठ्या संख्येनं वारकरी तसंच पुणेकर नागरिक हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी लाईन लावून दर्शन घेत आहेत. पण या गर्दीत सोलापूर येथील एक वारकरी शिवाजी कोळी हे गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घेत तरुणांनी गुटखा तंबाखू खाऊ नये, मुंढे साहेब आपण आहे म्हणून तरुण जिवंत आहे असं म्हणत जनजागृती करत आहेत.