'खासदारांचा आवाज बंद झाल्यानं कोकण रेल्वेचे प्रश्न प्रलंबित' - विनायक राऊत - VINAYAK RAUT ON NARAYAN RANE
🎬 Watch Now: Feature Video

Published : May 8, 2026 at 9:00 PM IST
रत्नागिरी : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार निद्रिस्त असून एकही खासदार कामाचा नाही. खासदारांचा आवाज बंद झाला असल्यानं कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,” असा आरोप त्यांनी केला. रत्नागिरी-दादर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आपण गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. मात्र, सध्याचे खासदार त्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. “कोकणवासीयांनी निवडून दिलेले खासदार झोपलेले आहेत,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे."