शेगाव येथे होणार आयुष मंत्रालयाचं तीन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन, राष्ट्रपतींची राहणार उपस्थिती - NATIONAL HEALTH CONFERENCE SHEGAON

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
पत्रकार परिषदेत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 8, 2026 at 5:33 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा - शेगाव येथे आयुष मंत्रालयाचे तीन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन होणार आहे. हे महासंमेलन बुलढाणा जिल्ह्यातील आध्यात्मिक केंद्र शेगाव येथील आनंद सागर परिसरातील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला होणार आहे. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी (आयुष) क्षेत्रातील देशभरातील दिग्गज तज्ज्ञ, वैद्य, संशोधक आणि मान्यवर उपस्थित राहतील.

हे महासंमेलन आयुर्वेदिक उपचार पद्धती, पारंपरिक औषधे आणि भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणालींचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमात विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे, प्रदर्शनी, मार्गदर्शन सत्रे, परिसंवाद, व्याख्याने आणि इंटरॅक्टिव्ह सेशन असतील. या माध्यमातून हजारो नागरिकांना थेट लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. आरोग्य तपासणी, आयुर्वेदिक उपचार सल्ला, योग प्रशिक्षण, औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आणि आधुनिक आरोग्य तंत्रज्ञान यांचा समावेश असेल.

केंद्रीय आयुष तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, “हे राष्ट्रीय महासंमेलन आयुष पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करेल आणि सामान्य नागरिकांपर्यंत त्याचा प्रसार करेल. शेगावसारख्या आध्यात्मिक ठिकाणी हे आयोजन होणे हे विशेष आहे.” या परिषदेत कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यासह स्थानिक प्रशासन आणि आयोजक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details