एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून घरात प्रवेश करताना अडकला चोर, पाहा व्हिडिओ - THIEF STUCK IN EXHAUST FAN HOLE
🎬 Watch Now: Feature Video

Published : January 6, 2026 at 4:46 PM IST
कोटा (जयपूर)- शहरामधील बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोर थेट घरातील एक्झॉट फॅनच्या जागेमधून घरात प्रवेश करत होता. मात्र, तिथेच तो अडकून पडला. बोरखेडाचे पोलीस अधिकारी अनिल टेलर यांनी सांगितलं की, सुभाष कुमार अहीर हे प्रतापनगर येथे राहतात. ते खाटू श्यामजी यांचे दर्शन करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. ते ४ जानेवारीला रात्री घरी पोहोचले. तेव्हा घराबाहेर एक्झॉस्ट फॅन येथे पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. एक तरुण एक्झॉस्ट फॅनच्या जागेपासून घरात प्रवेश करताना अडकला होता. त्याचे पाय घराबाहेर आले होते. तर डोके घरात पोहोचले होते. त्याला पाहताच प्रवासावरून परतलेल्या सुभाष कुमार यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्या तरुणाची सुटका केली. घरात बेकायदेशीररित्या प्रवास केल्यानं तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. बोरखेडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, घरमालकानं सजगता दाखविल्यानं चोरीची घटना टळली आहे. २५ वर्षीय पवन वैष्णव असे ओळख पटलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीसोबत एकजण साथीदार राहत होता. त्याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कार ताब्यात घेतली आहे. त्यावर पोलीस असे स्टीकर लावण्यात आलं होतं. तसेच कारमध्ये पांढऱ्या रंगाचे पडदे लावण्यात आले होते. अशा प्रकारच्या गाड्या बहुतांश पोलीस अधिकारी वापरतात.