महाराष्ट्राच्या नंदनवनात पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार, रंगीबेरंगी पॅराशूटमुळे उजळले पाचगणीचे अवकाश, पाहा व्हिडीओ - PARAGLIDING WORLD CUP

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
महाराष्ट्राच्या नंदनवनात पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 12:30 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंगच्या संयुक्त विद्यमाने पाचगणीत पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झालीय. या स्पर्धेसाठी रशिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिकेसारख्या 25 देशांतील प्रशिक्षित अडीचशे स्पर्धक पाचगणीत दाखल झालेत. युरोपसारख्या खंडात होणारी पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धा पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पठारावर होत आहे. पाचगणीत या स्पर्धेचा थरार सुरू झाला असून, रंगीबेरंगी पॅराशूटमुळे पाचगणीचे आकाश उजळून निघालंय. हवामान पाहून स्पर्धकांना आव्हानात्मक 'टास्क' दिला जातोय. पाचगणीच्या सिडने पॉइंट परिसरातून टेक ऑफ केल्यानंतर स्पर्धकांना आकाशातून मेढा, वाठार, वाई येथे सुरक्षित लँडिंग करावे लागते. जो स्पर्धक हवेचा वेग आणि दिशेचा अचूक अंदाज घेत कमीत कमी वेळेत हे अंतर पार करून सर्वाधिक गुण मिळवेल, तो या जागतिक स्पर्धेचा मानकरी ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details