रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन, मंदिर चोरी प्रकरणी गावागावी आंदोलन करण्याचा निर्धार - RAM RAKSHA MOVEMENT

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 18, 2026 at 10:59 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

रायगड - राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज रायगड जिल्ह्यातील महाड येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात 'रामरक्षा आंदोलन' करत सरकारवर जोरदार टीका केली. महाड येथील श्रीराम मंदिराबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत रामरक्षा पठण केलं. महाआरती केली आणि विविध घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाचा निषेध करणारे फलक आणि बॅनरही झळकवण्यात आले. या आंदोलनातून भाजपावर निशाणा साधत राम मंदिरातील देणग्यांचा आणि निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला. तसंच या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन आता रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि घराघरात पोहोचविण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे सेनेचे रायगड संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केली.