रायगड किल्ल्याच्या दक्षिण भागात भीषण वणवा; पाहा व्हिडिओ - TERRIBLE FIRE RAIGAD FORT
🎬 Watch Now: Feature Video

Published : March 13, 2026 at 8:25 PM IST
रायगड - स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या दक्षिण भागात चार दिवसांपूर्वी भीषण वणवा लागल्याची घटना समोर आली आहे. रायगड किल्ल्याच्या दक्षिणेकडील डोंगर उतार आणि खोल दरीच्या परिसरात ही आग लागली होती. या वणव्याचे भीषण दृश्य दाखवणारे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ते पाहून शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आणि भावना व्यक्त होत आहेत. वणव्यामुळे संपूर्ण डोंगररांग लालभडक ज्वाळांनी पेटल्याचे दृश्य अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रायगड किल्ल्यावर वास्तव्यास असलेल्या धनगर बांधवांनी अत्यंत धाडस दाखवत हा वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. विशेष म्हणजे या वणव्यामुळे रायगडावरील कोणत्याही ऐतिहासिक वास्तू किंवा स्मारकाचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रायगडासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे वणवे लागणे ही गंभीर बाब असल्याने शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी प्रशासनाने याबाबत अधिक खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.