34 गावांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र या; सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन - SUPRIYA SULE PUNE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
पदाधिकाऱ्यांची बोलताना खासदार सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 18, 2026 at 1:24 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात पुणे महानगपालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीआधी सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, निलेश निकम यांनी खासदार सुळेंचं स्वागत केलं. "34 गावांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र येत आवाज उठवला पाहिजे," असं सुप्रिया सुळेंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितलं. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चांनी जोर धरलाय. अशावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळं भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details