धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता 'कॉक्रोज'चे सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर आंदोलन; विद्यार्थ्यांनी काय सांगितलं? - COCKROACH JANATA PARTY NEWS
🎬 Watch Now: Feature Video

Published : June 11, 2026 at 6:34 PM IST
पुणे : पुण्यात आज कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीनं नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीनं शिक्षण क्षेत्राबाबत तसेच देशात होत असलेल्या पेपर फुटी प्रकरणाबाबत पक्षाच्या वतीनं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी तसेच कायदे अभ्यासक ॲड.असीम सरोदे आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम हे देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यामागणीसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. यावेळी ईटीव्ही भारतनं त्यांच्याशी संवाद साधत त्यांची मागणी आणि भावना समजून घेतली.