एमपीएससीने माहितीसह केलेल्या आरोपांवर विश्वास का ठेवला नाही, औषध निरीक्षक पद परीक्षेसंदर्भात तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याची खंत
🎬 Watch Now: Feature Video

Published : August 26, 2026 at 11:00 PM IST
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर आयोगानं चौकशी सुरू केली होती आणि अखेर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. या प्रकरणी अहिल्यानगरमधील परीक्षार्थी ऋषिकेश गांगुर्डे याने सर्वात पहिल्यांदा पेपर फुटीबाबत आरोप केले होते. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली होती. आज औषध निरीक्षक, गट-ब पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाल्यावर या विद्यार्थ्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, याबाबत जेव्हा मी ही माहिती समोर आणली तेव्हा आयोगाने विश्वास ठेवला नाही. उलट सहा-सहा तास माझी तपासणी करण्यात आली. ही परीक्षा दहा वर्षाने होत असते 2015 नंतर आत्ता 2026 मध्ये ही परीक्षा होणार होती. मात्र त्याचा देखील पेपर फुटला आणि हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झाल. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचं यावेळी त्याने सांगितलं. या परीक्षार्थीशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...