7 जुलैपासून संत तुकाराम, 8 जुलैपासून संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान; पालखी मार्गावर पोलिसांची करडी नजर - SANT TUKARAM PALKHI
🎬 Watch Now: Feature Video

Published : July 4, 2026 at 6:43 PM IST
पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला 7 आणि 8 जुलै रोजी सुरुवात होणार असून, या सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. वारकरी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केलं असून यंदाच्या वारीत 'डीजे-मुक्त', 'लाऊडस्पीकर-मुक्त' आणि 'हरित वारी' यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 8 जुलै रोजी आळंदी देवस्थान येथून प्रस्थान होणार आहे, तर संत तुकाराम महाराज पालखी 7 जुलै रोजी देहू येथून प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.