'सुवर्ण-हिरे जडीत मुकुट शोभतो बरा'; हरिणायाणाच्या भाविकाकडून साईमंदिरात ८० लाखांचा मुकूट अर्पण - SHIRDI SAIBABA TEMPLE NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
भाविकाकडून साईमंदिरात ८० लाखांचा मुकूट अर्पण (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 11:54 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी (अहिल्यानगर) -  नवीन वर्षाची सुरुवात होताच देश-विदेशातील लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेल्या भाविकांनी साईबाबांच्या चरणी भरघोस दान दिलं आहे. हरियातील फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती यांनी आपल्या परिवारासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी साईबाबांसाठी खास आणलेला तब्बल ८० लाख रुपये किमतीचा सुवर्ण-हिरे जडीत मुकुट साईचरणी अर्पण केला. साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार हा अत्यंत सुंदर आणि नक्षीमय मुकुट ५८५ ग्रॅम शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आला. त्यामध्ये १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे जडवण्यात आले आहेत. मुकुटाचे एकूण वजन ६५५ ग्रॅम आहे. काही काळ साईबाबांच्या मूर्तीवर हा मुकुट घालण्यात आला. त्यानंतर हा मुकुट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आला. साईबाबा संस्थानच्या वतीनं देणगीदार साईभक्ताची शाल, साईबाबा मूर्ती देऊन साईभक्त प्रदीप मोहंती आणि प्रतिमा मोहंती यांचा सत्कार करण्यात आला.   

ABOUT THE AUTHOR

...view details